दौंड, बोरमलनाथ येथे उद्या 
करिअरबाबतची कार्यशाळा

दौंड, बोरमलनाथ येथे उद्या करिअरबाबतची कार्यशाळा

दौंड, ता. २६ : दौंड शहर व बोरमलनाथ (ता. दौंड) या दोन ठिकाणी दहावी व बारावीनंतरच्या करिअर संबंधी विद्यार्थ्यांसाठी रविवारी (ता. २६) कार्यशाळा आयोजित केली आहे.
या कार्यशाळेचे संयोजक उल्हास मिसाळ यांनी याबाबत माहिती दिली की, रविवारी दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलाचे म्हसोबा मंदिराशेजारील अष्टविनायक सभागृह येथे आणि चौफुलाजवळील बोरमलनाथ (ता. दौंड) मंदिर सभागृहात करिअर कार्यशाळा होणार आहे. सकाळी दहा ते दुपारी साडेबारा, अशी कार्यशाळेची वेळ आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये तालुक्यातील शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली होती व त्या आधारे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. दहावी व बारावीनंतरचे विविध शिक्षण प्रवाह, करिअर निवडीमध्ये पालकांची भूमिका, करिअरचा निवडताना घ्यावयाची काळजी, वैद्यकीय - अभियांत्रिकी शिक्षण शाखेतील करिअर व त्यामध्ये नीट व जेईई परीक्षांचे महत्त्व व तयारी, विविध शैक्षणिक शिष्यवृती योजना, आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, क्रिएटिव्ह नॉलेज फाउंडेशन, दौंड तालुका मुख्याध्यापक संघ, आदी संस्थांनी या कार्यशाळेचे संयोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com