दौंड बाजारात गहू ३२५१ रुपये क्विंटल

दौंड बाजारात गहू ३२५१ रुपये क्विंटल

दौंड, ता. १९ : दौंड तालुक्यात गव्हाची आवक घटली असून, बाजारभावात वाढ झाली आहे. गव्हाची १४३१ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये; तर कमाल ३२५१ रुपये, असा असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात गव्हाची २६०० क्विंटल आवक होऊन त्यास किमान २०२५ व कमाल ३१०० रुपये, असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक व बाजारभाव स्थिर आहे. कांद्याची तब्बल १६,४५० क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान ३०० रुपये; तर कमाल ११०० रुपये बाजारभाव मिळाला आहे. फ्लॉवरची ४३० गोणी आवक होऊन त्यास प्रतिगोणी किमान १००; तर कमाल ३०० रुपये दर मिळाला आहे. तालुक्यात लिंबाची फक्त १० डाग आवक झाली असून, प्रतवारीनुसार किमान १०५० व कमाल २२०१ रुपये प्रति डाग, असा भाव मिळाला आहे.
तालुक्यात कोथिंबिरीची २८ हजार १२० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० रुपये, तर कमाल ५०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची ४८५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० व कमाल १५०० रुपये, असा बाजारभाव मिळाला.

भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो- १५०, वांगी- १५०, दोडका- ३००, भेंडी- ४००, कारली- ३००, हिरवी मिरची- ३५०, गवार- ६५०, भोपळा- ०७५, काकडी- ०७०, शिमला मिरची- ४५०, कोबी- ०५०.

कलिंगडाच्या दरात घट
दौंड मुख्य बाजारात कलिंगडाची १५५० क्रेट आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ४०; तर कमाल ७५ रुपये दर मिळाला. मागील आठवड्यात कलिंगडाची ११२० क्रेट आवक झाली होती व त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ७०; तर कमाल १०० रुपये दर मिळाला होता. खरबुजाची १४८० क्रेट आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोसाठी किमान १००; तर कमाल २०० रुपये दर मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com