दौंड शहरात विजय साजरा
दौंड, ता. ४ : बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांचा विजय झाल्यानंतर दौंड शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व दौंड पोलिस ठाण्यासमोरील राज्यघटना उद्देशिकास्तंभ येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी लाडू वाटण्यात आले. महाविकास आघाडीच्या समर्थकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व अन्य नेतेमंडळी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.