बोरीबेल येथील भुयारी मार्गासाठी १० कोटी मंजूर

बोरीबेल येथील भुयारी मार्गासाठी १० कोटी मंजूर

देऊळगाव राजे, ता.१५ : बोरीबेल (ता. दौंड) येथे रावणगाव देऊळगाव राजे मार्गावर रेल्वे भुयारी मार्ग बांधण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार ॲड.राहुल कुल यांनी दिली.
दौंड-सोलापूर लोहमार्ग गावाजळून गेला आहे. रेल्वे लाइनमुळे बोरीबेल हे गाव दोन भागात विभागले गेले असून, या एका भागातून दुसऱ्या भागात येण्याकरीता पाणी जाण्यासाठी असलेल्या छोट्या मोरीतून नागरिकांना प्रवास व वाहतूक करावी लागत आहे. सदर मोरी छोटी असल्याने त्यातून फक्त लहान वाहन जात आहे. त्या ठिकाणी मोठ्या भुयारी मार्गाची मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिक करीत होते. याचा विचार करून आमदार कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुरवा करून निधी मंजूर करून घेतला आहे.
सात मीटर रुंद व सहा मीटर उंच असलेल्या या भुयारी मार्गामुळे नागरिकांचे दळणवळण सोपे होणार असून मोठ्या वाहनांना रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या भागात जाण्यासाठी पार करावे लागणारे लांबचे अंतर कमी होणार आहे.यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

पन्नास वर्षांची मागणी पूर्ण
गावाजावळील रेल्वे लाइनमुळे दोन भागात विभागले गेलेल्या बोरीबेलकरांना मोठी वाहने दुसऱ्या भागात जाण्यासाठी लांब वळसा घालून जावे लागत असल्याने त्या ठिकाणी मोठा भुयारी मार्ग करण्याची मागणी ग्रामस्थ वारंवार करत होते. आमदार कुल यांनी पाठपुरावा करून हे काम मंजूर केल्याने मागील ५० वर्षांची मागणी पूर्ण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com