शिनोली येथे अपघातात
डंपर चालकाचा मृत्यू

शिनोली येथे अपघातात डंपर चालकाचा मृत्यू

घोडेगाव, ता. ३ : शिनोली (ता. आंबेगाव) गावाजवळील गंगापूर फाटा येथे मंचर-भीमाशंकर रस्त्यावर भरधाव डंपर पलटी झाल्याने चालक मंगेश मारुती काळे (वय ३२) याचा डंपरखाली सापडून मृत्यू झाला.
याबाबत घोडेगाव पोलिसांनी माहिती दिली की, मंगेश काळे हा डंपरवर (क्र. एम.एच. 14 ए.एस. ९९३२) चालक म्हणून काम करत होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास डंपर घेऊन जात असताना गंगापूर फाटा येथे डंपर उलटला. चालक बाजूकडे मंगेश हा डंपरखाली अडकला. यावेळी स्थानिक नागरिक व पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने डंपर उचलून गाडीखाली गुतलेला मंगेश याला बाहेर काढले. त्याला पुढील उपचारासाठी घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com