घोडेगावात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

घोडेगावात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

घोडेगाव, ता २४ : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे शहरातून प्रभातफेरीच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व चिन्हाबाबत चुकीचा निर्णय दिला आहे. तो पक्षपाती लोकशाहीला घातक आहे. अशा चुकीच्या निर्णयाबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आंबेगाव तालुका यांच्या वतीने निषेध मोर्चा व आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा संघटक अविनाश रहाणे म्हणाले, की भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी नसून तो हुकूमशाहीकडे जाताना दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा जो झंझावात चालू आहे. तो रोखण्यासाठी उध्दव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून आठ महिन्यांपूर्वी गद्दारी केली. यासाठी मोठा वजनदार माणसाचा वापर करून शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह याबाबत निवडणूक निर्णय अधिका-यांकडून निर्णय करून घेतला. चोरी करणाराचं मालमत्तेचा मालक होतो, असा अजब निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे.
यावेळी जिल्हा संघटक अविनाश रहाणे, तालुका प्रमुख दिलीप पवळे, महिला उपजिल्हा प्रमुख कलावती पोटकुले, युवती तालुका अधिकारी निलम गावडे, दिलीप चासकर, राजेंद्र सोमवंशी, अमोल काळे, सचिन घोलप, गुरूनाथ फलके, स्नेहा काळे, मोहम्मद शेजाद, विजय जाधव आ उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी भिकेला लावण्याचे काम भाजपचे सरकार करीत आहे. आता देवेंद्र फडणवीसच उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री आहेत. त्यांचे जर महाराष्ट्रावर प्रेम असेल, शेतकऱ्यांविषयी आपुलकी व प्रेम असेल तर त्यांनी आत्ता वीजबिल माफ करावे, अशी मागणी जिल्हा संघटक अविनाश रहाणे यांनी केली. यावेळी तालुका प्रमुख दिलीप पवळे, नीलम गावडे, स्नेहा काळे, कलावती पोटकुले, अमोल काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
........................................
02049

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com