घोडेगावात क्षयरोग निर्मूलनाबाबत जागृती

घोडेगावात क्षयरोग निर्मूलनाबाबत जागृती

घोडेगाव, ता. २७ ः येथील बी. डी. काळे महाविद्यालयातील विज्ञान विभाग व इंडियन ज्युनिअर/ युथ रेड क्रॉस समिती, पुणे यांच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पथनाट्य व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयातील विज्ञान विभागातील ३३ विद्यार्थ्यांनी घोडेगाव येथील बसस्थानक, अहिल्यादेवी चौक, आठवडे बाजारतळ आदी ठिकाणी उपस्थित ग्रामस्थ व नागरिकांसमोर पथनाट्याचे सादरीकरण केले. विविध घोषवाक्यांतून क्षयरोग निर्मूलनाबाबत विद्यार्थ्यांनी जागृती तेली. तसेच या रोगाची लक्षणे, त्यावरील उपचार, घ्यावयाची काळजी, शासकीय धोरणे इत्यादीवर विद्यार्थ्यांनी गाणी, गीते, घोषवाक्य, संवाद आदींद्वारे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या प्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी पथनाट्य सादरीकरणास भेट दिली. तसेच महाविद्यालयात क्षयरोग दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. पुरुषोत्तम काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन इंडियन ज्युनिअर/युथ रेड क्रॉस या समितीच्या समन्वयिका प्रा. मृणाली लोणकर व प्रा. राजश्री फलके यांनी केले. प्रास्ताविक प्रा. राजश्री फलके यांनी तर सूत्रसंचालन प्रा. अर्चना औताडे यांनी केले. प्रा. प्रणिता घोडेकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com