सेवानिवृत्तीनिमित्त चव्हाण, विरणक यांचा सत्कार

सेवानिवृत्तीनिमित्त चव्हाण, विरणक यांचा सत्कार

घोडेगाव, ता. ६ : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक विठ्ठल चव्हाण व लिपिक रामदास विरणक यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला. प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड हस्ते त्यांच्या गौरव करण्यात आला.
विठ्ठल चव्हाण यांची आदिवासी विकास विभागात वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक पदावर ३४ वर्षे सेवा झाली तर रामदास विरणक यांची वर्ग ४ कर्मचारी, अधीक्षक व त्यानंतर लिपिक टंकलेखक या पदांवर ३८ वर्षे सेवा होऊन ३१ मे २०२३ रोजी सेवापूर्ती झाल्याने दोघांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवर, विविध पदाधिकारी व कर्मचारी यांनी भाषणातून सन्मानार्थीना शुभेच्छा दिल्या.
सत्कारप्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी कैलास खेडकर, सोनुल कोतवाल, कार्यालयीन अधीक्षक योगेश खंडारे, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश दुरगुडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना विठ्ठल चव्हाण म्हणाले,"आदिवासी दुर्गम भागात अनुसूचित जमातीच्या वंचित समाजाला वैयक्तिक तसेच आदिवासी गावासाठी सामुदायिक विकासाच्या योजनेचा लाभ देणे, शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील शासकीय सोयीसुविधा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी तसेच पुणे, सातारा जिल्ह्यातील कातकरी समाजाला विविध शासकीय योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी विशेष प्रयत्न करता आले याचे समाधान आहे."
तानाजी बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन तर माधव सूर्यवंशी यांनी आभार मानले.
.........................................
02229, 02230

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com