गुळुंचे-कर्नलवाडी रस्ता
येत्या २७ मार्चपर्यंत बंद

गुळुंचे-कर्नलवाडी रस्ता येत्या २७ मार्चपर्यंत बंद

गुळुंचे, ता. २३ : नगर-सातारा महामार्गावरील गुळुंचे- कर्नलवाडी (ता. पुरंदर) या रस्त्याचे चढ काढण्याचे काम चालू असल्याने हा रस्ता २३ मार्च ते २७ मार्च, असा पाच दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नीरेकडून मोरगावकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी नीरा-जेजुरी-मोरगाव या पर्यायी रस्त्याचा वापर करावा.
याबाबत बारामती बांधकाम विभागाच्या वतीने आदेश काढला असून, त्यामधे नीरा-मुर्टी-मोरगाव- सुपे रस्त्यामध्ये सुधारणा करण्याच्या कामांतर्गत कि.मी. ६/६६० ते ७/०२५ हा भाग गुळुंचे-कर्नलवाडी हद्दीमध्ये लांबीमधील कठीण चढाचे खोदकाम करण्याचे काम प्रगतीत आहे. या रस्त्याचे खोदकाम करण्यासाठी रस्ता बंद केला हे. या कालावधीमध्ये या रस्त्यावरील अवजड वाहने व इतर वाहतूक नीरा-वाल्हे-जेजुरी-मोरगाव या पर्यायी मार्गाने वळवण्यात यावीत. सातारा-नगर महामार्गावरील नीरा ते मोरगाव दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे बुधवारी (ता. २२) रात्री उशिरा सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com