सासवडला तेल्याभुत्याच्या कावडीचे स्वागत

सासवडला तेल्याभुत्याच्या कावडीचे स्वागत

सासवड शहर, ता. १२ : सासवड (पुरंदर) येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात तेल्याभुत्याच्या मानाच्या कावडीचे नारायण महाराज यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
शिखरशिंगणापूर येथील महादेवाच्या लिंगावर कऱ्हेच्या पाण्याची धार घालून मग यात्रेची सांगता झाली व त्यानंतर मंगळवार (ता.११) कावड सासवडला आली. येथे कावडीची ग्रामप्रदक्षिणा होऊन कावड सासवड शहराजवळचे प्रसिद्ध असलेल्या श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात आली. याठिकणी हजारो सासवडकरांनी कावडीचे स्वागत केले. मंदिरात पहाटे देवांना अभिषेक घालण्यात आला. सत्यनारायण महापूजा झाली. त्यानंतर सद्गुरु नारायण महाराज यांच्या हस्ते महादेवाची आरती झाली व सासवडच्या मानाच्या तेल्या भुत्याच्या कावडीचे पूजन करण्यात आले. यावेळी हर "हर महादेव"चा जयघोष करण्यात आला. त्यानंतर नारायण महाराज यांच्या उपस्थित महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. या भंडाऱ्याचा लाभ दिवसभर भाविकांनी घेतला.

यावेळी या भागाचे माजी नगरसेवक संजय गणपत जगताप यांच्या हस्ते नारायण महाराज यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नारायणपूर मंदिराचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर, माजी नगरसेवक अजित जगताप, दादासाहेब भुजबळ, माजी सरपंच रामभाऊ बोरकर, रमेश भगत, दिगंबर भिंताडे, संजय दत्तात्रेय जगताप, सासवड कावडीचे महाराज कैलास बुवा कावड, संदीप अशोक जगताप, शिवाजी जगताप, अशोक जगताप, धीरज जगताप, सौरभ जगताप, दिलीप नाना जगताप, यांनी भंडाऱ्याचे नियोजन केले.

06744

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com