एसटी संघटनांचा वापर 
राजकारणासाठी होऊ नये ः पवार

एसटी संघटनांचा वापर राजकारणासाठी होऊ नये ः पवार

सासवड शहर, ता. ५ :कर्मचारी संघटनांनी स्वतःच्या हितासाठी जरूर संप, आंदोलन करावीत पण राजकारणासाठी त्याचा वापर होता कामा नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत रावसाहेब पवार यांनी केले.
महाराष्ट्राच्या जनतेची जीवनवाहिनी म्हणून परिचित असलेल्या एसटी अर्थात लालपरीचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन राज्यात सर्वत्र साजरा करण्यात आला. सासवड एसटी आगारात कर्मचारी संघटनेने यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पवार बोलत होते. या कार्यक्रमाला एसटीचे वरिष्ठ अधिकारी गिरीश साबळे, सामाजिक कार्यकर्ते दादा जगताप व एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवासी, एसटी कर्मचारी व अधिकारी या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करत एसटी टिकवण्याचे काम करावे, असे पवार यांनी केले. एसटी महामंडळाचे संचालक याबाबत फार दक्ष नाहीत, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.
एसटी बसच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. एसटी स्थानकातील सर्व प्रवाशांना यावेळी पेढे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संघटनेचे अध्यक्ष कैलास जगताप यांनी केले. तर सूत्रसंचालन पोपट जैनक यांनी केले. प्रभारी आगार व्यवस्थापक प्रवीण माळशिकारे, महेश भोंगळे, प्रवीण गायकवाड, बापू होले, सुंदरम खोमणे, शरद पराळे, हेमंत ताकवले, लेखाकार मनीषा खोपडे यांसह वाहक, चालक आणि प्रवासी यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com