गिरीजा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिडवई बिनविरोध

गिरीजा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिडवई बिनविरोध

जुन्नर, ता. २ : गोळेगाव (ता.जुन्नर) येथील गिरिजा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेश बिडवई तर उपाध्यक्षपदी दीपक कोकणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी सचिवपदी राजेंद्र ताम्हणे व खजिनदारपदी भारत शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहायक निबंधक सचिन सरसमकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत गिरिजा संस्थापक पॅनेलचा एक हाती विजय झाला. सर्वसाधारण गटातील आठ जागांसाठी निवडणूक झाली तर चार जागा बिनविरोध झाल्या होत्या. सर्वसाधारण गटातील आठ जागेसाठी १४ उमेदवार रिंगणात होते. गिरिजा संस्थापक पॅनेलचे आठही उमेदवार बहुसंख्य मताने निवडून आले. संस्थापक पॅनेलचे राजेश बिडवई, दीपक कोकणे, राजेंद्र ताम्हाणे, भारत शेटे, सदाशिव ताम्हणे, तुकाराम बिडवई, गणेश गाडेकर व विश्वनाथ शेटे हे विजयी झाले तर जितेंद्र बिडवई, विश्वनाथ काळे, लीलाबाई काळे व मनीषा बाळसराफ हे बिनविरोध निवडून आले. पतसंस्था यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. संस्थेचे एकूण १७२२ सभासद असून नऊ कोटी चाळीस लाख रुपयांच्या ठेवी संस्थेकडे आहेत. संस्था स्थापनेपासून सतत ''अ'' वर्ग मिळाला असून सभासदांना दरवर्षी १२ टक्के लाभांश दिला आहे.

04997, 04998

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com