बाळ हिरडा खरेदीबाबत 
मंत्रालयात आज बैठक म

बाळ हिरडा खरेदीबाबत मंत्रालयात आज बैठक म

जुन्नर, ता. ८ : आदिवासी विकास महामंडळामार्फत बाळ हिरडा खरेदी केंद्रे सुरू व्हावीत, यासाठी मंगळवारी (ता. ९) आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी मुंबई येथे मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती किसान सभेचे पुणे जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे व जुन्नर तालुका सचिव लक्ष्मण जोशी यांनी दिली.
महाराष्ट्रात आंबेगाव, जुन्नर, अकोले व इगतपुरी तालुक्यात प्रामुख्याने बाळ हिरडा उत्पादन होते. आदिवासी शेतकऱ्यांचे हिरडा नगदी पीक आहे. वनोपज सदरात येणाऱ्या व मालकी जमिनीवरही घेतल्या जाणाऱ्या हिरडा उत्पादनामुळे आदिवासी शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असते. सरकारी खरेदी सुरू झाल्यास भावाबाबत स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना लाभ होतो. महामंडळाने सन २०१६-१७ पासून बाळ हिरडा खरेदी बंद केली. त्यामुळे खासगी व्यापारी कमी भावाने हिरडा खरेदी करून आदिवासी शेतकऱ्यांची लूटमार करतात. त्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी सरकारने बाळ हिरडा खरेदी केंद्रे सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. या प्रश्नांसाठी किसान सभेच्या वतीने अकोले ते लोणी पायी मोर्चात काढला होता. यावेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मागण्याचा पाठपुरावा करण्यात येत असल्याचे निगळे यांनी सांगितले.
यावेळी किसान सभेच्या तालुका अध्यक्ष माधुरी कोरडे, कार्याध्यक्ष कोडींभाऊ बांबळे, उपाध्यक्ष मुकुंद घोडे, गणपत घोडे, रोहिदास बोऱ्हाडे, राजू शेळके, नारायण वायळ, शंकर माळी आदी उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीला आदिवासी विभागाचे संबंधित सर्व अधिकारी; तसेच किसान सभेचे जुन्नर, आंबेगाव व अकोले तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com