शासन आपल्या दारी उपक्रम
दिव्यांगांसाठी राबविणार

शासन आपल्या दारी उपक्रम दिव्यांगांसाठी राबविणार

जुन्नर, ता. ३० : दिव्यांगांना मोफत साहित्यासाठी पूर्व नाव नोंदणी व आरोग्य तपासणी शिबिर तसेच विविध अडचणी सोडविण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे संघटनेच्या रविवार (ता. २८) रोजी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.
संस्थेच्या जुन्नर येथील कार्यालयात प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
यावेळी दिव्यांग, वंचित, विधवा व ज्येष्ठ नागरिक यांना येणाऱ्या विविध अडचणींवर चर्चा करण्यात आली. संजय गांधी निवृत्ती वेतन योजनेत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांची मुले २५ वर्षाची झाल्यानंतर निवृत्तिवेतन बंद करण्यात येणार ही अट शासनाने रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. दिव्यांगांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी लवकरच प्रत्येक गावात जाऊन दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न समजावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दिव्यांगांना युनिक कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी नारायणगाव व वारूळवाडी या भागातील दिव्यांगांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी विलास विश्वासराव व बल्लाळवाडी विभागासाठी वर्षा शिंदे यांची विभागीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी अरुण शेरकर, दत्तात्रेय हिवरेकर, राहुल मुसळे, सुनील कलोशिया, सुनील जंगम, सौरभ मातेले, श्रीहरी नायकोडी, सागर पवार, अमोल तळपे, शांताराम बर्डे, गणेश शेटे, भूषण सराईकर व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com