पुरंदर ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी अभंग

पुरंदर ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी अभंग

खळद, ता. ३ : पुरंदर तालुका ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी रोहित रामदास अभंग, कार्याध्यक्षपदी सुरेश दिगंबर जगताप तर उपाध्यक्षपदी महेंद्र दिगंबर लोणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आले.
पंचायत समिती पुरंदर येथे बुधवारी (ता.३) पुरंदर तालुका ग्रामसेवक युनियनच्या सर्वसाधारण सभेत पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियनचे कार्याध्यक्ष संदीप ठवाळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली मावळते अध्यक्ष प्रभाकर पवार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या अध्यक्षपदी ही निवड झाली. तर याच वेळी इतर निवड प्रक्रिया ही पार पडली.
यावेळी पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे संचालक विलास बडढे, पुरंदर तालुका ग्रामसेवक युनियनचे सचिव राजेंद्र खंडाळे, रमेश राऊत, अनिल खळदकर, काशिपती सुतार, शशांक सावंत, महेश म्हेत्रे, नितीन खोमणे, सुनील माने, विलास नेवसे, नाना गरड, वडवले, जयेंद्र सुळ, अनिता भोस, सुरेखा साबळे, रेखा मांढरे, सोनाली पवार, शरद धिनवडे व इतर सभासद उपस्थित होते.
निवडीबद्दल प्रगती पॅनेलचे प्रमुख व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन घटना दुरुस्ती समितीचे अध्यक्ष अनिल कुंभार, श्रीकांत वाव्हळ , सरचिटणीस अनिल बगाटे, पतसंस्था संचालक अमोल घोळवे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com