विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या 
शिखराच्या कामाचे भूमिपूजन

विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शिखराच्या कामाचे भूमिपूजन

खळद, ता. २३ : शिवरी (ता. पुरंदर) येथे ग्रामदैवत असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शिखराच्या कामाचे भूमिपूजन माऊली महाराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. येथे सुमारे ६० ते ७० लाख रुपये खर्च करून सभामंडप व शिखराचे काम करण्याचे नियोजन ग्रामस्थांनी केले असून यामध्ये साधारणपणे ३० फूट रुंद व ५० फूट लांबीच्या सभामंडपाचे, ३५ फूट उंचीच्या शिखराचे काम होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकवर्गणी जमा करण्याचे काम ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. सभामंडपाचे काम बहुतांश पूर्ण झाले असून नुकतेच शिखराच्या कामाचेही भूमिपूजन पार पडले. कार्यक्रमाचे पौरोहित्य मोहन काका खळदकर यांनी केले.
या कार्यक्रमप्रसंगी विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष बबनराव कामथे, सरपंच प्रमोद जगताप, उपाध्यक्ष नवनाथ कामथे, आत्माराम कामथे, राजाभाऊ क्षिरसागर, बबन कामथे, बाळासाहेब लिंबोरे, शांताराम कामथे, समीर कामथे, विकास कामथे, वासुदेव लिंबोरे, सुधीर कामथे, महादेव कामथे, बाबूराव टेकवडे, अमर कामथे यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
या सभामंडपासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे १५ लाख रुपये, पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप ५ लाख रुपये, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रेय झुरंगे यांच्याकडून ४ लाख रुपये निधी मिळाला. इतर लोकवर्गणी करण्यात आली तर यामध्येही
दीपक कदम, काका आंबावडेकर, टीआयपीएल यांनी मोलाची मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com