मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबाचा आक्रोश

मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबाचा आक्रोश

कोरेगाव भीमा, ता. २२ : येथे पीर साहेब दर्गाजवळ नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन किशोरवयीन मुले रविवारी (ता. २१) बुडाली. त्यापैकी गौरव स्वामी (वय १६) या मुलाचा मृतदेह बुडालेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर डिंग्रजवाडी येथील ढोम वस्तीजवळ सापडला. तर, दुसऱ्या मुलाचा मृतदेह दुपारी दोनच्या दरम्यान बुडालेल्या ठिकाणाजवळच सापडला. याप्रसंगी कुटुंबीयांचे दुःख व आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
कोरेगाव भीमा येथे बंधाऱ्याजवळ पोहण्यासाठी गेलेल्या दोन किशोरवयीन मुले पाण्यात बुडाल्यानंतर नागरिक व प्रशासनाने युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली. मात्र, उशिरापर्यंत शोध घेऊनही त्यांचा शोध लागू शकला नव्हता. त्यामुळे सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु केल्यानंतर बुडालेल्या ठिकाणापासून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर डिंग्रजवाडी येथील ढोम वस्तीजवळ गौरव स्वामी (वय १६) या मुलाचा मृतदेह सकाळी साडेअकराच्या दरम्यान सापडला; तर अनुराग विजय मांदळे (वय १६) याचा मृतदेह दुपारी दोन वाजता बुडालेल्या जागेजवळच सापडला.
या शोध मोहिमेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण वाघोली अग्निशमन केंद्राचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, सुजित पाटील, केंद्र अधिकारी विजय महाजन, वाहन चालक - बोट ऑपरेटर - ओंकार पाटील, ज्ञानेश्वर राठोड, उमेश फाळके, सूरज इंगवले, विकास पालवे, प्रकाश मदने, संदीप तांबे यांनी दोन दिवस अथक प्रयत्न केले.
या प्रसंगी पोलिस पाटील मालन गव्हाणे, तानाजी ढेरंगे, सोनू भोकरे, कुंडलिक ढेरंगे, सोमनाथ मुळे तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. पठारे, कॉन्स्टेबल अशोक केदार यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com