पारगाव येथील एकाचा 
नदीत आढळला मृतदेह

पारगाव येथील एकाचा नदीत आढळला मृतदेह

केडगाव, ता. २७ : पारगाव (ता. दौंड) येथे भीमा नदीच्या पात्रात गुरुवारी (ता. २६) एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र, या मृतदेहाचा आणि पारगाव हत्याकांडाचा संबंध नसल्याचे उघडकीस आले.
या मृतदेहाची ओळख पटली असून, त्यांचे नाव लक्ष्मण ऊर्फ लखन बापूराव सूर्यवंशी (वय ४३, रा. पारगाव, ता. दौंड), असे आहे. त्यांचा मृतदेह पारगाव येथे भीमा नदीच्या पुलाजवळ नागरगाव (ता. शिरूर) येथे वन विभागाच्या हद्दीत अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. ते सुमारे पंधरा दिवसांपासून बेपत्ता होते. साधारणतः दीड वर्षांपासून ते एकटेच भाड्याने खोली घेऊन पारगाव येथे राहत होते.
गुरुवारी सकाळी नदी किनारी त्यांचा मृतदेह दिसला. पारगाव बंधाऱ्यावर त्यांच्या चपला व त्या शेजारी कीटकनाशक औषधांची बाटली, कानटोपी सापडली आहे. त्यांच्या भोवताली रक्ताचे ओघळ दिसत होते. कीटकनाशक पिल्याने रक्ताचे जुलाब होऊन मृत्यू झाला असावा, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी मृत्यूचे कारण अस्पष्ट सांगितले आहे. मांडवगण पोलिस चौकीचे सहायक पोलिस उप निरीक्षक राजेंद्र साबळे हे अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com