छंदवर्गातून विज्ञानाची तोंडओळख
चौफुला परिसरात वीटभट्टीवरील मजुरांच्या मुलांसाठी उपक्रम

छंदवर्गातून विज्ञानाची तोंडओळख चौफुला परिसरात वीटभट्टीवरील मजुरांच्या मुलांसाठी उपक्रम

केडगाव, ता. २५ : वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या ४५ मुलांसाठी छंदवर्ग घेण्यात आले. मुलांना छोट्या-छोट्या गोष्टींत विज्ञान कसे आहे, हे समजावून सांगण्यात आले. या विशेष उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
कल्परुण सोशल फाउंडेशन, पुणे आणि बालस्नेहालय फाउंडेशन यांच्यावतीने व अगस्था फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

या छंदवर्गातून मुलांना खेळातून, कृतीतून, शिक्षणातून विज्ञानातील गमतीजमती सहजपणे दाखविण्यात आल्या. यात ‘स्ट्रॉ’पासून पिपाणी बनविणे, आइस्क्रीम स्टीक रबरपासून पिपाणी, फुगे फुगवून शरीराच्या वजनाने फुगा फोडणे असे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. चहाचे कप व दोरा यांचा वापर करून फोन बनविणे, रद्दी पेपरपासून वेगवेगळ्या प्रकारच्या कागदी टोप्या बनविणे, ‘स्ट्रॉ’चा वापर करून पाण्याचे कारंजे बनविणे, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविणे, कागदी पिशव्या बनविणे, फुग्याने निशाणा साधणे, मुलांचे निरीक्षण आणि एकाग्रता, शक्ती वाढवणे, मानवी शरीररचना व त्याचे महत्त्व सांगून खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यातील अनेक गोष्टी मुले पहिल्यांदाच शिकत होती. पाच दिवसांच्या वर्गानंतर निरोप समारंभ घेण्यात आला. दिवेकर मॅडम आणि भिसे यांनी मार्गदर्शन केले, अशी माहिती बालस्नेहालयाच्या प्रमुख शबनम डफेदार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com