डोंगरगाव येथे रंगणार कीर्तन महोत्सव

डोंगरगाव येथे रंगणार कीर्तन महोत्सव

कोळवण, ता. २८ : श्री भैरवनाथ उत्सवानिमित्त डोंगरगाव गावठाण (ता. मुळशी) येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले असून या कीर्तन महोत्सवाचे यंदाचे हे ५६ वर्ष आहे.

या सप्ताहात दररोज काकड आरती, भजन, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर असे आध्यात्मिक कार्यक्रम होणार असून सोमवारी (ता. २९) श्रीहरी महाराज हळंदकर, मंगळवारी (ता. ३०) शालीकराम महाराज खंदारे, बुधवारी (ता. ०१) डॉ. अजिंक्य महाराज चाकणकर, गुरुवारी (ता. ०२) नितीन महाराज काकडे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. यानंतर महाप्रसाद भोजनाने या कीर्तन महोत्सवाची सांगता होईल. परिसरातील भाविक भक्तांनी कीर्तन श्रवण व महाप्रसाद भोजनाचा लाभ घेण्याचे आवाहन भैरवनाथ तरुण मंडळ व ग्रामस्थ मंडळ डोंगरगाव गावठाण यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com