VIVA17 Basketball Tournament Concludes with Great Zeal

VIVA17 Basketball Tournament Concludes with Great Zeal

Sakal

Basketball Tournament : गोविंद पोफळेचा चमकदार खेळ; VIVA17 बास्केटबॉल स्पर्धेत अंडर-12 ‘बेस्ट प्लेयर’

VIVA17 Basketball Tournament Concludes with Great Zeal : पिंपळे सौदागर येथील VIBGYOR High ने आयोजित केलेली सतरावी VIVA17 बास्केटबॉल स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली, ज्यात U-12 बॉईज गटात सेंट मेरी स्कूलने विजेतेपद पटकावले, गोविंद पोफळे 'बेस्ट प्लेयर' ठरला आणि U-14 बॉईज गटात VIBGYOR, तर U-14 गर्ल्स गटात इंदिरा नॅशनल स्कूलने बाजी मारली.
Published on

पुणे : VIBGYOR High, पिंपळे सौदागर यांच्या वतीने आयोजित VIVA17 Basketball Tournament 2025 उत्साहात पार पडली. सलग सतराव्या वर्षी आयोजित या स्पर्धेत पुण्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. U-14, U-12 आणि U-10 अशा तिन्ही वयोगटांत मुला–मुलींचे सामने खेळवले गेले. U-14 गटात 14 टीम्स, U-12 गटात 11 टीम्स तर U-10 गटातही चांगला प्रतिसाद मिळाला.

U-12 बॉईज गटात सेंट मेरी स्कूलने विजेतेपद पटकावत दमदार खेळ सादर केला, तर या गटातील सर्वांची मने जिंकली ती गोविंद पोफळेने. त्याच्या उत्कृष्ट स्कोरिंग आणि खेळातील प्रभुत्वामुळे तो ‘बेस्ट प्लेयर’ म्हणून निवडला गेला. गोविंदला त्याचे स्पोर्ट्स टीचर्स अरुण चोपडे आणि विलास सुनगुडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, U-14 बॉईज विजेते VIBGYOR पिंपळे सौदागर तर U-14 गर्ल्स विजेत्या इंदिरा नॅशनल स्कूल ठरल्या.

VIVA17 Basketball Tournament Concludes with Great Zeal
Pune Crime : तरुणीला मारहाण व शिवीगाळ; पोलिसांसह आठ जणांवर गुन्हा दाखल; कोथरूडमधील प्रकार!

U-12 गटात मुलींच्या विभागात सेंट मेरी A विजेते, तर U-10 बॉईज आणि गर्ल्स या दोन्ही गटांमध्येही St. Mary’s ने विजेतेपद मिळवत आपला दबदबा कायम ठेवला.

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी दाखवलेला खेळाडूपणा, टीमवर्क आणि शिस्त कौतुकास्पद ठरला. VIBGYOR High पिंपळे सौदागर यांच्या उत्कृष्ट आयोजनामुळे ही सतरावी स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com