करंदीत आढळला पुरुषाचा मृतदेह

करंदीत आढळला पुरुषाचा मृतदेह

शिक्रापूर, ता. २७ : करंदी (ता. शिरूर) येथील मांजरेवाडी चासकमान कालव्याच्या कडेला एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की, करंदी येथील मांजरेवाडी चासकमान कालव्याजवळ स्थानिक शेतकरी विनायक सातपुते हे जनावरे चारण्यासाठी घेऊन गेले असताना त्यांना या ठिकाणी एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक रेवणनाथ मुत्तनवार, प्रतीक जगताप, करंदीच्या पोलिस पाटील वंदना साबळे, वाजेवाडीच्या पोलिस पाटील सोनाली वाजे, सामाजिक कार्यकर्ते कचरू वाजे, कोंडिबा साबळे, राघू नप्ते, विशाल नप्ते, विनायक सातपुते, दादा सातपुते, सर्जेराव वाघमारे यांसह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी तिथे एका मध्यमवयीन पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृताच्या अंगावर निळसर रंगाची पॅंट व पांढऱ्या रंगाचा मळलेला शर्ट असल्याचे निदर्शनास आले. याबाबत विनायक दशरथ सातपुते (रा. मांजरेवाडी- करंदी) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे खबर दिल्यावरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली तर घटनास्थळी केंदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माया पवार यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले व मृतदेहाचे दफन करण्यात आले.
या व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ९४०५५८७००२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com