मोई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कल्याणी गवारी

मोई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कल्याणी गवारी

कुरुळी, ता. २ : मोई (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कल्याणी योगेश गवारी यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती ग्रामसेवक भास्कर वीर यांनी दिली. मोई ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी, यासाठी उपसरपंच साकोरे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त जागेसाठी सरपंच शीला रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली.
यावेळी कल्याणी गवारी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच रोकडे यांनी घोषित केले. यावेळी माजी उपसरपंच गोरख गवारे, सदस्य कैलास साकोरे, संतोष येळवंडे, मंगल गवारी, सारिका करपे, आरती फलके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच कल्याणी गवारी यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच व सर्व सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com