कुष्ठरोगावर उपचार करा,
आजार होणार बरा

कुष्ठरोगावर उपचार करा, आजार होणार बरा

काटेवाडी, ता. २९ : कुष्ठरोग या आजाराबाबत असलेले गैरसमज व अंधश्रद्धा मागे पडत आहेत. या आजाराबाबत होत असलेली जनजागृती व उपचारांमुळे हा आजार बरा होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. जिल्हा कुष्ठरोग विभागाच्या प्रयत्नांमुळे वर्षभरात ६०३ कुष्ठरोगी बरे झाले आहेत. तर सध्या ६८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशाला कुष्ठरोगापासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारचा महत्वकांक्षी उपक्रम आहे. या अंतर्गत लोकशिक्षणातून कुष्ठरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभाग व कुष्ठरोग विभागाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम व पंतप्रधान प्रगती योजने अंतर्गत या वर्षी ३० जानेवारी ते १५ फेब्रुवारी या पंधरवड्याच्या निमित्ताने कुष्ठरोग या आजाराच्या जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

२० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रत्यक्षपणे कुष्ठरोग सर्वेक्षण झाले. या सर्वेक्षणामध्ये २९६ कुष्ठरोगी आढळून आले. या आजाराबाबत असलेले गैरसमज, अंधश्रद्धा दूर व्हाव्यात यासाठी कुष्ठरोग निर्मूलन विभागाच्यावतीने पुणे व पिंपरी-चिंचवड या नागरी भागात आपण ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत नागरी भागात रन फॉर लेप्रसीचे आयोजन केले जाणार आहे.

यामध्ये शालेय विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक, वैद्यकीय क्षेत्र, स्वयंसेवी संस्था यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. तर खेड, शिरूर, दौंड, इंदापूर या तालुक्यात तसेच शहरी भागात वैद्यकीय तज्ञांची मार्गदर्शन देखील होणार आहे. १३ तालुके व शहरी भागात शालेय प्रश्न मंजूषा कार्यक्रमाचे तसेच आरोग्य मेळाव्याचे आयोजन कुष्ठरोग विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे.

कुष्ठरोगाबद्दल गैरसमज अथवा अंधश्रद्धा
* कुष्ठरोग आनुवंशिक आहे.
* कुष्ठरोग हा ज्याने पाप केले आहे त्यांनाच होतो.
* कुष्ठरोग हा दैवी शाप आहे. तसेच देवाची करणी, देवाचे नवस न फेडल्याने होतो.
* कुष्ठरोगाच्या उपचारासाठी पूजा-अर्चा, नवस न फेडणे, मंत्र तंत्र हे उपाय करणे.


शास्त्रीय माहिती
* कुष्ठरोग हा आजार समाजातील कोणत्याही व्यक्तीला व ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे त्यांना होतो.
* कुष्ठरोग होणे किंवा न होणे हे त्या व्यक्तीच्या रोगप्रतिकार शक्तीवरच अवलंबून असते.
* कुष्ठरोग विरुद्धच्या नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीमुळे आपल्यापैकी ९८ टक्के लोकांना कुष्ठरोग होवु शकत नाही.
* कुष्ठरोग बद्दल बचावासाठी कोणतीच लस अजूनपर्यंत तरी उपलब्ध झालेली नाही.
* कुष्ठरोग हा बहुविध औषधोपचारामुळे पूर्णपणे बरा होतो. व त्यावरील औषधी ही सर्व शासकीय, निमशासकीय केंद्रामधे व स्वयंसेवी संस्थामधे मोफत मिळतो.
* कुष्ठरोग हा आजार कुष्ठरोग बाधित असलेल्या उपचार न घेतलेल्या व्यक्तीपासूनच प्रसार होतो. (खोकणे व शिंकणे)
* कुष्ठरोगाचा प्रसार हा जंतुपासून होतो हे जंतू खोकण्यातुन व शिंकण्यातून हवेमार्फत पसरतो. तसेच या आजाराचे जंतू हवेमधे १५ ते २० दिवस राहतात. म्हणूनच हा आजाराचा अधिवास काल सध्या ३ व ५ वर्ष किंवा त्याहून ही जास्त इतका दीर्घ कालावधी असतो.


अजूनपर्यंत लोकांना हे माहीत नाही की, हा आजार जंतुपासून होतो. परंतु कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या जंतुपासुन हा आजार होतो. कुष्ठरुग्ण हा बहुविध औषधेपचाराचा पहीला डोस सुरू केलेल्या दिवसापासूनच्या या रोगाचा प्रसार करू शकत नाही. कारण या बहुविध ओषधोपचारच्या मात्रेमधे या आजाराचे जंतू मारण्याचे प्रमाण ९९.१९ टक्के आहे. कुष्ठरुग्ण बाधित व्यक्तीला दूर करू नका, त्यांना ही आपल्यामध्ये मिळून मिसळून घ्या. समाजामधे त्यांना इतरांसारखी वागणूक द्या. इतर अजगराप्रमाणेच हा सुद्धा एक आजार आहे.
- डॉ. हुकुमचंद पाटोळे, सहाय्यक संचालक, कुष्ठरोग विभाग पुणे जिल्हा

आजाराची प्राथमिक लक्षणे
* न खाजणारा व न दुखणारा फिकट किंवा लालसर रंगाचा बधिर चट्टा
* जंतूपरीक्षण पॉझिटिव्ह असणे
* मज्जाबाधीत असणे.

अशी करा घरीच तपासणी
* शरीरावर चट्टे किंवा डाग असल्यास बॉलपेन किंवा अगवाच्या टोकाने डागांवर/चट्ट्यांवर अलगदपणे टोचून पहावे. संवेदना झाली नाही तर नजीकच्या दवाखान्यात जाऊन शरीराची संपूर्ण तपासणी करून घ्यावी.


कुष्ठरोगाची मागील वर्षातील आकडेवारी
बरे झालेले रुग्ण : ६०३
उपचार घेत असलेले रुग्ण : ६८२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com