गुऱ्हाळ घरासाठी उसाच्या बाजारभावाची हनुमान उडी

गुऱ्हाळ घरासाठी उसाच्या बाजारभावाची हनुमान उडी
Published on

खुटबाव, ता. १ : दौंड तालुक्यातील पूर्ण क्षमतेने सुरू असणाऱ्या ४०० गुऱ्हाळ घरांसाठी उसाच्या बाजारभावाची हनुमान उडी घेतली आहे. पारगाव येथील दोन शेतकऱ्यांचा ऊस ३६०० रुपये प्रतिटनाने एका गुऱ्हाळ चालकांनी खरेदी केली आहे. शेतकरी विजय ताकवणे व‌ शिवाजी तांबे यांना उसासाठी ३६०० रुपये उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे.

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस गुऱ्हाळ घरासाठी प्रतिटन ३००० रुपये बाजारभाव होता. याचवेळी तालुक्यातील कारखान्यांनी ३००० रुपये प्रतिटन उसाचा पहिला हप्ता काढला. भीमापाटस कारखान्याने ऊस मिळावा म्हणून १५ जानेवारीपासून ३३०० रुपये पहिला हप्ता जाहीर केला. यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उसाची कमतरता जाणवू लागली‌ आहे. त्यामुळे तालुक्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या दीड महिन्यात गुऱ्हाळ घरामध्ये प्रतिटन ६०० रुपये बाजारभाव वाढल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

गुऱ्हाळ चालकांची उसासाठी धावाधाव
मकर संक्रांतीनंतर हळूहळू ऊन वाढीस लागते. याचा परिणाम ऊस तोडणी कामगारावर होतो. त्यामुळे हळूहळू ऊस तोडणीचे प्रमाण कमी होते. तालुक्यातील ऊस संपण्याच्या मार्गावर असल्यामुळे तालुक्यातील गुऱ्हाळ चालकांची उसासाठी अक्षरशः धावाधाव सुरू झाली आहे. गुऱ्हाळ चालकाच्या या स्पर्धेचा ऊस शिल्लक असणारे शेतकरी मात्र गुऱ्हाळ चालकांना ऊस दरासाठी वेटिंगवर ठेवून आनंद घेत आहेत.


उसासाठी रंगली स्पर्धा
दौंड तालुक्यात शिल्लक असलेल्या उसाबाबत कारखान्यांनी सर्व्हे केला आहे. यामध्ये अजूनही तालुक्यात एक लाख टन ऊस गाळपासाठी शिल्लक आहे. गुऱ्हाळ घराला चांगला बाजारभाव मिळेल. या आशेने शेतकऱ्यांनी ऊस राखीव ठेवला आहे. यामुळे तालुक्यातील शिल्लक ऊस कारखान्याला जाणार की गुऱ्हाळाघरावर जाणार यासाठी स्पर्धा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com