आंबेगावातील ९ सोसायट्यांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल

आंबेगावातील ९ सोसायट्यांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल

मंचर, ता.१५ : “आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द, शिनोली, डिंभे खुर्द, आसाणे, तळेघर, तिरपाड, चास, पेठ, पिंपळगाव घोडे या नऊ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणूकीचा बिगुल वाजला आहे. सोमवारपासून (ता.१३) इच्छुकांना संचालक पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे सहायक निबंधक (सहकार) पी.एस.रोकडे यांनी दिली.
अवसरी खुर्द, पेठ, तळेघर, डिंभे खुर्द, चास, शिनोली या सहकारी सोसायट्यांची आर्थिक उलाढाल मोठी आहे. सभासदांची संख्या ही अधिक आहे. निवडणुकांकडे सहकार क्षेत्रातील मान्यवरांचे लक्ष लागून राहिले आहे.
सोसायट्यांची नावे व निवडणुकीचा कार्यक्रम :-
शिनोली, डिंभे खुर्द, तळेघर :- सोमवार (ता.१३) ते रविवार (ता.१७) पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत, बुधवार (ता.८ मार्च) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, शनिवार (१८मार्च) मतदान.
आसाणे : सोमवार (ता.१३) ते रविवार (ता.१७) पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत, बुधवार (ता.८ मार्च) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, रविवार (ता.१९ मार्च) मतदान.
अवसरी खुर्द : मंगळवार (ता.१४) ते सोमवार (ता.२०) पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत, बुधवार (ता.८ मार्च) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, शनिवार (ता.१८मार्च) मतदान.
तीरपाड : सोमवार (ता.१३) ते रविवार (ता.१७) पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत, बुधवार (ता.८ मार्च) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवार (ता.१७ मार्च) मतदान.
चास : मंगळवार (ता.१४) ते सोमवार (ता.२०) पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत, बुधवार (ता.८ मार्च) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, मंगळवार (ता.२१ मार्च) मतदान.
पेठ, पिंपळगाव घोडे :- मंगळवार (ता.१४) ते सोमवार (ता.२०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत, बुधवार (ता.८ मार्च) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, रविवार (ता.१९ मार्च)मतदान होणार आहे.
“निवडणूक सोसायटीची अर्ज दाखल करणे,अर्ज मागे घेणे,चिन्ह वाटप करणे आदी निवडणूक प्रक्रिया मंचर येथील सहायक निबंधक कार्यालयातून (कृषी उत्पन्न बाजार समिती आवर) होणार आहे. याबाबतची माहिती सहायक निबंधक कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे.”असे रोकडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com