मंचर नगरपंचायतीतर्फे दोन कोटींची घरपट्टी वसूल

मंचर नगरपंचायतीतर्फे दोन कोटींची घरपट्टी वसूल

मंचर, ता.२ : मंचर नगरपंचायतने घरपट्टी व पाणपट्टीची शुक्रवारी (ता.३१ मार्च) अखेर घरपट्टी दोन कोटी ३१ लाख २७ हजार ३५९ रुपये व पाणीपट्टी एक कोटी ३२ लाख दोन हजार ३४० रुपये रक्कम वसूल झाली आहे.” अशी माहिती मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.
ते म्हणाले “मंचर नगरपंचायतीची एकूण मागणी पाच कोटी २७ लाख ४१ हजार १०६ रुपये व पाणीपट्टीची मागणी २ कोटी ३६ लाख ४८ हजार ८९४ रुपये असे एकूण सात कोटी ६७ लाख ९० हजार रुपये इतकी होती. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी इनायत मिर्झा, सुजाता जाधव,संगीता निघोट, अतुल लोंढे, रमेश डिंगोरकर, हनुमंत भालेराव, चंद्रकांत गवारे, स्वप्नील लोंढे, अक्षय राजगुरू, विभावरी देठे, स्नेहा मिसाळ, शहाजी थोरात या कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत होते. नगर पंचायतचे इतर उत्पन्न विकासशुल्क, नगरपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स जागाभाडे व हस्तांतरण फी या इतर उत्पन्नातून एक कोटी ३७ लाख आठ हजार ६१२ रुपयांची वसुली झाली आहे.

मंचर नगरपंचायतीचे कामकाज शुक्रवारी (ता.३१ मार्च) रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होते. एका दिवसात २७ लाख ४० हजार ७८४ रुपये रक्कम जमा झाली आहे. आर्थिक वर्षातील वसुलीची टक्केवारी ५२.५५ टक्के झाली आहे. यापुढे नागरिकांनी व व्यावसायिकांनी आपली कराची रक्कम वेळेत जमा करावी.
- गोविंद जाधव, मुख्याधिकारी मंचर नगरपंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com