‘शिक्षण, नोकरीसाठी लागणारे दाखले त्वरित मिळावेत’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शिक्षण, नोकरीसाठी लागणारे 
दाखले त्वरित मिळावेत’
‘शिक्षण, नोकरीसाठी लागणारे दाखले त्वरित मिळावेत’

‘शिक्षण, नोकरीसाठी लागणारे दाखले त्वरित मिळावेत’

sakal_logo
By

मंचर, ता. ७ : “सध्या शासनस्तरावर विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व नोकरीसाठी लागणारे दाखले मिळण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजना हाती घेऊन विद्यार्थ्यांना लागणारे दाखले त्वरित उपलब्ध करून द्यावे,”अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन थोरात यांनी मंचर (ता. आंबेगाव) येथील प्रांत कार्यालयात आंबेगाव-जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना दिले. यावेळी नवनाथ थोरात, उत्तम राक्षे, कालिदास गांजाळे, स्नेहल चासकर, विजय शिंदे, अक्षय थोरात, गणेश थोरात उपस्थित होते.
“दहावी बारावीचे निकाल लागले आहेत. महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच सध्या जून-जुलै या महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ७५००० नोकर भरतीसाठी विविध शासकीय पदाच्या जाहिराती प्रस्तावित आहेत. त्यासाठी रहिवासी दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेयर दाखला, जात पडताळणी दाखला अशा प्रकारची कागदपत्रे आवश्यकतेनुसार लागत आहेत. योग्य त्या उपाययोजना हाती घेऊन त्वरित दाखले उपलब्ध करून द्यावे.” असे थोरात यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.