Dilip Walse Patil
Dilip Walse Patil sakal

Dilip Walse Patil : घरात पडल्यामुळे वळसे पाटील जखमी

पुण्यातील घरात पाय घसरून पडल्यामुळे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पायाला व हाताला फ्रॅक्चर झाले.

मंचर : पुण्यातील घरात पाय घसरून पडल्यामुळे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पायाला व हाताला फ्रॅक्चर झाले. त्यांना बुधवारी रात्री पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

शनिवारी (ता. ३०) डॉक्टर शस्रक्रिया करणार आहेत. याबाबत वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वी म्हणाल्या, ‘‘डाव्या बाजूचा हात व खुबा यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज आहे. ते लवकरच बरे होऊन सामाजिक कामात सक्रिय होतील. डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्यांना कोणीही भेटण्यासाठी येऊ नये.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com