

मंचर, ता. ११ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित देवदर्शन पदयात्रेचे मंचर शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने व संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा काढण्यात आली होती.
पदयात्रा शिंगवे, पारगाव, काठापूर, जारकरवाडी, लोणी, वाळुंजनगर, खडकवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर, जवळे, मंचर, अवसरी, रांजणी, वळती या मार्गाने मंचरमध्ये दाखल झाली. मंचर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अश्वारूढ पुतळ्याला अभिषेक, पूजन व पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय थोरात यांनी पदयात्रेचे स्वागत केले. त्यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘‘हिंदू तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करणं हे आपल्या इतिहासाच्या स्मरणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे,’’ असे थोरात यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.