शिरवली सोसायटीच्या 
अध्यक्षपदी रणजित धुमाळ

शिरवली सोसायटीच्या अध्यक्षपदी रणजित धुमाळ

माळेगाव, ता. २७ ः शिरवली (ता. बारामती) येथील शिरवली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी रणजित वसंतराव धुमाळ यांची निवड झाली. सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष धुमाळ हे सध्या बारामती सहकारी बॅंकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच उपाध्यक्षपदी बबन रामचंद्र देशमुख यांना काम करण्याची बिनविरोध संधी मिळाली आहे. सोसायटीचे मावळते अध्यक्ष राजेंद्र बांदल, मावळते उपाध्यक्ष दत्तात्रेय यादव यांनी आपल्या पदाचा ठरवून दिलेला कालावधी पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता. त्यानुसार सदर रिक्त पदांची निवडणूक प्रक्रिया सहायक निबंधक (सहकारी संस्था) मिलिंद टांकसाळे यांच्या आधिपत्याखाली पार पडली. यावेळी उत्तमराव पोंदकुले, राजेंद्र वाबळे, सचिव-अभिजित यादव, निशिकांत निकम, ईश्वर बागव, विजय घनवट, प्रविंद पोंदकुले, संभाजी यादव, पोपट जाधव, सुभाष मदने, सुनील पोंदकुले, उदयसिंह शिळमकर, शिवाजीराव पोंदकुले, सोसायाटीचे संचालक सुरेश नाझिरकर, प्रल्हाद पोंदकुले, हेमराज निकम आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com