मेडद येथे लोकसहभागातून ओढा खोलीकरण

मेडद येथे लोकसहभागातून ओढा खोलीकरण

मोरगाव, ता. १७ : मेडद (ता. बारामती) येथे सकाळ रिलीफ फंड, शरयू फाउंडेशन व लोकसहभागातून नुकताच गटकळ वस्ती येथील चौदाशे मीटर ओढा खोलीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तालुक्यातील नैसर्गिक जलस्रोत बळकट करण्यासाठी अनेक वर्षांपासून ओढ्यात साचलेला गाळ उपसा करून पाणीसाठा वाढविण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन ओढा खोलीकरण कामाची सुरुवात करून दिली.
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व खोलीकरणाचे काम प्रभावीपणे अजित पवार यांच्याकडून बारामती तालुक्यासाठी जवळपास ७० लाख रुपयांचा निधी ओढा खोलीकरणाच्या कामासाठी उपलब्ध झाला आहे. टंचाईग्रस्त भागातील अनेक गावांनी सुमारे सत्तर लाख रुपये लोकवर्गणी तयार करून आपापल्या गावात ही कामे करून घेतली आहेत.
मेडद ग्रामपंचायतीसह शेतकरी विक्रम आटोळे, महेश खोमणे, महेश ढवाण यांच्या मागणीमुळे सकाळ रिलिफ फंडातून येथे आर्थिक मदत उपलब्ध झाली तर शरयू फाउंडेशनच्या अध्यक्ष शर्मिला पवार यांनी येथील ओढा खोलीकरणाच्या कामासाठी मोफत पोकलेन मशिन उपलब्ध करून दिले. त्यामुळे येथे चौदाशे मीटरचे काम पूर्ण झाले आहे. वर्षानुवर्षे साचलेला गाळ पूर्ण क्षमतेने निघाला आहे. येथील भाग दलदलीचा असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता ही नव्हता मात्र ओढा खोलीकरणाच्या कामामुळे ओढ्याच्या एका बाजूस रस्ता झाला असून दलदलीच्या भागातून अतिरिक्त साचणारे पाणी वाहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खोलीकरणाच्या कामासाठी पुढाकार घेणारे तसेच रिलीफ फंड व शरयू फाउंडेशन यांच्याविषयी शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.


01432

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com