कळंब परिसरात कांदे बियाणे फुलोऱ्यात 
कळंब परिसरात कांदे बियाणे फुलोऱ्यात

कळंब परिसरात कांदे बियाणे फुलोऱ्यात कळंब परिसरात कांदे बियाणे फुलोऱ्यात

महाळुंगे पडवळ, ता. १९ : आंबेगाव तालुक्यात कळंब, चांडोली बुद्रूक, चास, साकोरे, महाळुंगे पडवळ आदी गावातील शेतकऱ्यांनी कांदा बियाणे तयार केले आहे. बाजारपेठेत कांद्याच्या बियाण्यांबाबत फसवणूक होण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग स्वतःच्या शेतामध्ये बियाणे तयार करण्याकडे वळाले आहेत. सध्या बियाण्यासाठी लागवड केलेले कांदे फुलोऱ्यात आले आहेत.
उत्पादित कांदा पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने कांदा लागवड क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. परिणामतः कांदा बियाण्याचा तुटवडा निर्माण होऊन चढ्या बाजारभावाने शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करावी लागते. तसेच मिळणाऱ्या बियाण्यातही भेसळ असल्याने नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात कांदा बियाण्याचे उत्पादन घेत आहेत.
फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक फवारल्यास मधमाशांना हानी होते. खुरपणी करताना फुलदाड्यांना हानी होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
“लागवडीनंतर १४० ते १६० दिवसाच्या दरम्यान गोड्यांमध्ये बियाणे टच भरते व काळसरपणा दिसायला लागतो. सर्व गोंडे एकदम तयार होत नाहीत, जसजसे ते तयार तसतसे काढून घ्यावेत. साधारणपणे तीन ते चारवेळा गोंड्याची काढणी हाताने करावी लागते. चांगल्या प्रकारे सुकलेल्या गोंड्यातून बी वेगळे करावे. त्यानंतर उफणनी बी स्वच्छ करावे. बियाणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये भरून ठेवावे. त्याची गुणवत्ता चांगली राहते,’’ असे चास येथील शेतकरी बाळासाहेब चासकर यांनी सांगितले.

कांद्याच्या चांगल्या दर्जाच्या उत्पादनासाठी गोल टपकळ कांदा निवडावा लागतो. त्यामध्ये कांद्याचे मधोमध दोन काप करून कांद्याच्या मुळाकडचा अर्धा काप जमिनीत गाडून त्याला येणाऱ्या डेंगळ्यातून बी धरावे लागते. या प्रक्रियेतून तयार झालेले बी दर्जेदार व चांगल्या प्रतीचे असते.
- सुरेश खंडू भालेराव, शेतकरी, कळंब

01595

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com