ढोकेश्वर टाकळीतील विवाहितेचा हुंड्यासाठी छळ

ढोकेश्वर टाकळीतील विवाहितेचा हुंड्यासाठी छळ
Published on

नारायणगाव, ता. ११ : लग्नात हुंडा दिला नाही, माहेरकडून एक लाख रुपये घेऊन ये या कारणावरून मारहाण व शिवीगाळ करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी ढोकेश्वर टाकळी (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील विवाहितेचा पती, सासू, दीर व नणंद यांच्यावर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
याप्रकरणी विवाहितेचा पती राजेंद्र पुरुषोत्तम क्षीरसागर (वय ४०), सासू शकुंतला पुरुषोत्तम क्षीरसागर (वय ६०), दीर अनिल पुरुषोत्तम क्षीरसागर (वय ३५), नणंद सपना अजित प्रधान (वय ३०, सर्व रा. ढोकेश्वर टाकळी) यांच्यावर हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कल्पना राजेंद्र क्षीरसागर (वय ३७, सध्या रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नातेवाइकांच्या मध्यस्थीने कल्पना यांचा विवाह २६ फेब्रुवारी २००६ रोजी ढोकेश्वर टाकळी येथील राजेंद्र पुरुषोत्तम क्षिरसागर यांच्याशी झाला. लग्नाचा सर्व खर्च कल्पनाचे वडील चिंतामणी जाधव यांनी केला. कल्पना यांना एक मुलगा व दोन मुली, अशी अपत्ये आहेत. पती राजेंद्र व दीर अनिल यांना दारूचे व्यसन आहे. ते कोणताही काम धंदा करत नाहीत. ते दोघेही दारू पिऊन कल्पना यांना वारंवार शिवीगाळ व मारहाण करत असत. कल्पना या मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत होत्या. कल्पनाचे वडील चिंतामणी जाधव यांनी अनेक वेळा मध्यस्थी करून आरोपींची समजूत घातली. मात्र त्यानंतरही लग्नात हुंडा दिला नाही, माहेरकडून एक लाख रुपये घेऊन ये, या कारणावरून कल्पना यांचा शारीरिक, मानसिक छळ केला जात होता.
कल्पनाच्या जिवाला धोका असल्याने चिंतामणी जाधव यांनी मुलगी कल्पना व तिच्या मुलांना २६ एप्रिल रोजी नारायणगाव येथे घेऊन आले. सध्या कल्पना ही वारूळवाडी येथे आई व वडील यांच्यासोबत राहून वडिलांच्या मदतीने चरितार्थ चालवत असून मुलांचे शिक्षण करत आहेत. दरम्यान २४ मे २०२५ रोजी पती राजेंद्र क्षिरसागर पहाटे एकच्या सुमारास दारूच्या नशेत वारूळवाडी येथे आला. त्याने लाथ मारून दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. शिवीगाळ करून पत्नी कल्पना व सासू यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर तो फरारी झाला. याबाबतची तक्रार कल्पना क्षीरसागर यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिल्यानंतर चौकशी करून कल्पनाचा पती, सासू, दीर व नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com