दिवळे येथे बिबट्याचे दर्शन

दिवळे येथे बिबट्याचे दर्शन

नसरापूर, ता. ३ : दिवळे (ता. भोर) येथे गुरुवारी (ता. २) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुख्य रस्त्याच्या जवळच झाडीमध्ये गावातील काही ग्रामस्थांना बिबट्या दिसला. यावेळी तेथील तरुणांनी त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून वनखात्याला याबाबत माहिती दिली. वनखात्याने या भागात बिबट्याचा वावर होत असल्याचे मान्य केले असून, ग्रामस्थांना याबाबत सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे.
कापूरव्होळ-नारायणपूर या मुख्य रस्त्यालगत दिवळे गावच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास रस्त्याकडेच्या झाडा झुडपात या बिबट्याचे दर्शन येथील हॉटेल व्यावसायिक अनिल बाठे व त्यांच्या समवेत असलेले सागर बाठे, जितेश बाठे, भाऊ माने, प्रदिप बाठे यांना झाले. त्यांनी झाडामधून रस्त्याकडे येण्याचा प्रयत्न करणाऱ्या या बिबट्याला पुढे लाइट दिसल्याने तिथेच थांबून पुन्हा मागील गव्हाच्या शेतांमधून तो पसार झाला. यावेळी उपस्थितांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण देखिल केले. याबाबत वनखात्यास माहिती दिल्यावर शुक्रवारी सकाळी वनरक्षक बी. एस. तांबे व एन. एस. तगडे यांनी त्या ठिकाणी भेट दिली व बिबट्या कोठे गेला असेल, याची माहिती घेतली व नागरीकांना घाबरून न जाता सावधानता बाळगण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. साधारण चार वर्षांपूर्वी याच गावात एक मादी व दोन वाढ झालेले बिबट्या चे बछडे मृतावस्थेत आढळले होते त्याची आठवण यामुळे ताजी झाली.
नसरापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी संग्राम जाधव यांनी गावातील नागरीकांना यावेळी सावधानतेचा इशारा दिला. तसेच, बिबट्याचे अस्तित्व जाणवल्यास लगेचच नजीकच्या वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधा, असे आवाहन केले.

दिवळे (ता. भोर) : गुरुवारी रात्रीच्या सुमारास दिसलेला बिबट्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com