दिव्यांग कल्याण निधी वाटपामध्ये भेदभाव

दिव्यांग कल्याण निधी वाटपामध्ये भेदभाव

नसरापूर, ता.११ : नसरापूर ग्रामपंचायतीमध्ये २०१७ ते २०२० या कालावधीत दिव्यांग कल्याण निधीच्या वाटपात हेतुपुरस्सर भेदभाव झाल्याची तक्रार येथील दिव्यांग मधुकर रामचंद्र उकिर्डे यांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायत, तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून माहिती अधिकारात माहिती मागवण्यात आली. परंतु समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने उकिर्डे यांच्या पदरात निराशा पडली आहे.

नसरापूर (ता. भोर) येथील दिव्यांग मधुकर उकिर्डे यांच्या वतीने त्यांचा मुलगा सोमनाथ उकिर्डे यांनी या बाबत तक्रार केली आहे. शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या उत्पन्नामधून पाच टक्के निधी अपंग कल्याणासाठी खर्च करावयाचा असतो व त्यामधील पन्नास टक्के निधी दिव्यांगाच्या सार्वजनिक बाबींवर तर पन्नास टक्के दिव्यांगाच्या वैयक्तिक लाभासाठी खर्च करावयाचे असतात नसरापूर मध्ये अपंग कल्याण निधीसाठी पात्र असलेल्या यादीमधून उकिर्डे यांचे नाव हेतुपुरस्सर वगळण्यात आले असून, त्यांना २०१७ पासून अपंग कल्याण निधीचा लाभ देण्यात आला नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत सोमनाथ उकिर्डे यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करून अपंग यादीमधून मधुकर यांचे नाव का वगळले व त्यांचा मंजूर निधी न देता कोठे वापरला गेला याबाबत माहिती घेण्यासाठी अर्ज केला. परंतु त्यास कोणतेही उत्तर न आल्याने त्यांनी या बाबत भोर पंचायत समिती व मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे. यावर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी भोर यांना अर्जदाराच्या अर्जानुसार चौकशी करून तक्रारीचे निवारण करण्यात यावे, असे आदेश दिले होते परंतु अद्याप त्या बाबत चौकशी होऊन कार्यवाही झालेली नाही.

मधुकर उकिर्डे यांना २०१७ ते २० अपंग निधी दिला गेला नाही. त्या कार्यकालात मी या ग्रामसेवक नव्हतो त्यामुळे निधी का थांबला या बाबत माहिती नाही परंतु आता जर वरिष्ठांनी आदेश दिला तर त्यांचा निधी दिला जाईल.
- विजय कुलकर्णी, ग्रामसेवक, नसरापूर

ग्रामसेवक उपस्थित नसल्याने २४ जानेवारीची सुनवाई होऊ शकली नाही परंतु उकिर्डे यांना ही असलेली माहिती तयार आहे ती त्यांना दिली जाईल.
- ए. आर. दंडे, अपिलीय विस्तार अधिकारी, पंचायत समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com