संघर्ष समिती आंदोलनावर ठाम

संघर्ष समिती आंदोलनावर ठाम

नसरापूर, ता.२६ : खेड-शिवापूर टोलनाका हटवण्यासाठी टोलनाका संघर्ष समितीने जाहीर केलेल्या आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे. समितीच्या सदस्यांबरोबर चर्चा करण्यासाठी भोर, हवेली प्रांताधिकारी व महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी यांनी राजगड पोलिस ठाण्यात बैठक पार पडली. यामध्ये समिती आंदोलनावर ठाम असल्याने अधिकाऱ्यांनी दोन दिवसात जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
संघर्ष समितीच्या वतीने दोन एप्रिल रोजी टोलनाक्यावर टोलहटावर आंदोलन केले जाणार आहे. त्यास तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी व कार्यकर्त्यांकडून पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच आंदोलनाबाबत मार्ग निघावा यासाठी प्रशासनाच्या वतीने संघर्ष समितीच्याबरोबर नसरापूर राजगड पोलिस ठाण्यात बैठकीचे आयोजन केले. या बैठकीस हवेलीचे प्रांताधिकारी संजय आसवले, भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील,महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम, भोरचे तहसीलदार सचिन पाटील, हवेलीचे तहसीलदार किरण सरवदे, टोल ठेकेदार कंपनीचे अमित भाटिया, राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील व काही अधिकारी तर टोल संघर्ष समितीकडून ज्ञानेश्वर माऊली दारवटकर, शैलेश सोनवणे, वेल्हे तालुक्यातील शंकरराव भुरुक, माजी सभापती लहुनाना शेलार, सुनील कांबळे, स्वप्नील कोंडे, राजेंद्र कदम, सचिन बदक, अरविंद सोंडकर, दाद आंबवले, गणेश खुटवड, शुभम यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

खेड शिवापूर येथील टोल माफी संदर्भात महामार्ग प्राधिकरणाने पत्र दिले नसून, टोलव्यवस्थापनाने दिले आहे. टोल माफी संदर्भात व टोल हटवण्यासंदर्भात निर्णय माझ्या हातात नाही.
- संजय कदम, प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी


टोलनाक्याविषयीचे मुद्दे धोरणात्मक निर्णयाचे आहेत. याबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेऊ शकतात. त्यांची दोन दिवसात वेळ मिळत आहे. आंदोलनाअगोदर ही बैठक आयोजित करून चर्चा करण्यात येईल.
- राजेंद्र कचरे, प्रांताधिकारी

03219

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com