घोडगंगा साखर कारखाना सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पवार

घोडगंगा साखर कारखाना सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पवार

न्हावरे, ता.१४ : न्हावरे (ता.शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आत्माराम शिवाजी पवार तर उपाध्यक्षपदी तात्या दादाभाऊ जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाची अटीतटीची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये आत्माराम पवार, तात्या जाधव, तात्यासाहेब शेलार, वसंत ढमढेरे, राजाराम जगताप, बापूसाहेब सातकर, शिवाजी कुल, सुनील जगताप, शंकर मासाळ, शोभा शिंदे यांची संचालकपदी निवड झाली होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली त्यामध्ये अध्यक्षपदी पवार तर उपाध्यक्षपदी जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शंकर कुंभार, सचिव राजेंद्र सोनवणे यांनी काम पाहिले. आमदार अशोक पवार व कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभासदांचे प्रश्न सोडवून संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सांगितले.


01596, 01595

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com