थापलिंगसाठी निधी कमी पडून देणार नाही

थापलिंगसाठी निधी कमी पडून देणार नाही

निरगुडसर ता. १५ ः श्रीक्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थानसाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून देणार नसल्याची ग्वाही माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागापूर (ता. आंबेगाव) येथील श्रीक्षेत्र थापलिंग देवस्थान भेटीप्रसंगी दिली.
नागापूर येथे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान गडावरील वृक्षारोपण, बैलगाडा घाट, मंदिर परिसर, मंगल कार्यालय जागा आदींची पाहणी केली. याबाबत सविस्तर माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी वळसे पाटील यांना दिली. यावेळी सरपंच गणेश यादव, डी. एन. पवार, सुनील शिंदे, प्रकाश पवार, नवनाथ पोखरकर, भरत म्हस्के, गणेश म्हस्के, सूर्यकांत भागवत, रामचंद्र म्हस्के, संजय पोहकर, मंगेश वाघ, डॉ. संजय भोर, सचिन पवार, बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. यावेळी वळसे पाटील यांनी देवस्थानमधील चालू विकास कामांचा आढावा घेतला. तसेच देवस्थानचे मंगल कार्यालय बांधकाम व मंदिराचा जीर्णोद्धार करण्याबाबत चर्चा केली. तसेच घाट व वृक्षारोपण केलेल्या वृक्षांची पाहणी करण्यात आली. यावेळी वळसे पाटील यांचा देवस्थानकडून सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com