इंदापूरचे विकासरत्न

इंदापूरचे विकासरत्न

इंदापूरचे विकासरत्न

इंदापूर तालुक्यात सन २०१४ मध्ये माननीय दत्तात्रेय भरणे मामा यांच्या माध्यमातून विकासरत्न, आरोग्यदूत उदयास आला. सन २०१४ व सन २०१९ अशा दोन वेळा विधानसभा निवडणुकीत दत्तात्रेय भरणे मामा हे आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी वीस वर्षे मंत्रिपदावर असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचा दोनदा पराभव केला. त्यानंतर त्यांनी आमदार व अडीच वर्षे मंत्रिपदावर काम करत आपला विकासाचा रथ सध्याला दौडतच ठेवला आहे. आगामी वर्षात सर्वच निवडणुका होणार असल्याने त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती मिळवण्याची वेळ आली आहे.

- शौकत तांबोळी, नीरा नरसिंहपूर

आमदार दत्तात्रेय भरणे यांनी आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये इंदापूर तालुक्यामध्ये १३०० कोटींचा निधी आणून विकासाचा डोंगर निर्माण केला. त्यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास तीनशे कोटीची विकास कामे केली होती. यातून जिल्हा परिषद अध्यक्षांना असणारे अधिकार व कर्तव्याची प्रथमच राज्यातील नागरिकांना जाण करून दिली. इंदापूर तालुक्यातील विकास कामाच्या पर्वाला खरी सुरवात ही सन २०१२ मध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दत्तात्रेय भरणे मामा असताना झाली होती. त्यांनी या माध्यमातून केलेल्या विकास कामामुळेच तालुक्यातील जनतेने त्यांना सन २०१४ मध्ये आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली.

इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी, दिव्यांग, विधवा, परीतक्ता, गरजू यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या जिवाचे रान केले. त्यामुळे त्यांना खरा अर्थाने अल्पसंख्याक, मागासवर्गीय, गोरगरीब, सर्वसामान्य जनतेने डोक्यावर घेतले. त्यांनी गावोगावी दिलेल्या विकास कामाच्या निधीमुळे सर्वसामान्य जनता त्यांच्यावर खूष झाली. परंतु, एवढ्याच कामावर थांबणार, ते भरणे मामा कुठले? तालुक्याच्या चोहोबाजूचा विकास करायचा, हा पक्का विचारच करून ते कामाला लागले आहेत.

दत्तात्रेय भरणे मामा यांनी पहिल्याच आमदारकीच्या जिवावर केलेल्या तालुक्यातील विकास कामाच्या जोरावर सन सन २०१९ मध्ये पुन्हा आमदार म्हणून विजय प्राप्त केला. त्यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश केला. त्यांना सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, वने व मृद संधारण व सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री पद बहाल केले. त्यांच्याच जोडीला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांना देण्यात आले.

दत्तात्रेय भरणे मामा यांनी मंत्रिपदाच्या माध्यमातून मागील अडीच वर्षांमध्ये तीन हजार कोटीपेक्षा जास्तीचा निधी इंदापूर तालुक्यामध्ये खेचून आणला आहे. त्यामध्ये रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, गावा गावातील अंतर्गत रस्ते, सभामंडप, व्यायाम साहित्य, हायमास्ट दिवे, घरकुल आदींना सदर निधी मंजूर करून आणला आहे. प्रामुख्याने लाकडी लिंबोडी योजनेसाठी साडेतीनशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. तर, इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा त्यांनी बावडा येथील सभेत केली. त्यामुळे २२ गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याला सध्याला प्राधान्य दिले आहे.

नीरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, भीमा नदीवरील पूल दुरुस्ती, नीरा नदीवरील बंधारे, निरनीमगाव, बोराटवाडी, खोरोची येथे पुलाची उभारणीला कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे. बावडा-नरसिंहपूर राज्य मार्गासाठी रस्ते दुरुस्तीमधून ५७ कोटीचा निधी दिला. तर, शिंदेवस्ती ते जेजुरी रस्त्याच्या कामासाठी २०४ कोटी रुपयांच्या निधी देऊन काम पूर्ण केले आहे.

आगामी काळात इंदापूर तालुक्यामध्ये विकास कामाची एक नवीन पर्व निर्माण करून त्याचा आदर्श राज्याला दाखवून देण्यासाठी दत्तात्रेय भरणे मामा हे रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांच्या दरबारात जाणाऱ्या प्रत्येक नागरिक हा आपल्या पदरात काही ना काही घेऊनच
आनंदात परतत असतो. तसेच, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये राज्यात आदर्श असे काम निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे आशेने पाहत आहे.

आरोग्य दूत मामा
तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील जनतेला आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यासाठी दत्तात्रेय भरणे मामा यांनी आता त्यावर लक्ष केंद्रित केले असून, गावोगावी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आरोग्याचा प्रश्न गंभीर असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरात घेऊन जाऊन त्यांच्यावर मोठं मोठाल्या शस्त्रक्रिया मोफत करून त्यांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे विकासरत्न मामा आता सर्वसामान्यांचा आरोग्य दूत म्हणून गळ्यातील ताईत बनले आहेत. ज्या कुटुंबांना आरोग्यासाठी मदत केली आहे, त्यांच्यावर कायमचाच ठसा उमटवून सोडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com