हिरड्याच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

हिरड्याच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

फुलवडे, ता. १३ : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण, आहुपे खोऱ्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी गारांच्या पावसाने हिरडा या वन उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे हिरड्याचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन बिरसा ब्रिगेड आंबेगाव यांच्यावतीने तहसीलदार रमा जोशी यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष प्रवीण पारधी यांनी दिली.
आदिवासी समाजाचे प्रमुख आर्थिक साधन म्हणून हिरडा पिकाकडे पहिले जाते. वर्षातून एकदा येणाऱ्या या पिकावरच आर्थिक नियोजन अवलंबून असते. त्याचं पिकाचे नुकसान झाल्याने आदिवासी समाज हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसात गारपिट झाल्यामुळे या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हिरडा डोळ्यासमोर पडून गेला आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
सदरचे निवेदन नायब तहसीलदार संजय असवले यांनी स्वीकारले. याप्रसंगी मातृशक्ती प्रमुख उमाताई मते, ताराबाई डामसे, मंगल कवठे, कविता डगळे, अरुणा खमसे उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com