गुरोळीतील शाळेत ‘चला जगाशी बोलू या’ उपक्रम

गुरोळीतील शाळेत ‘चला जगाशी बोलू या’ उपक्रम

पारगाव मेमाणे, ता. १३ ः पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील गुरोळी गावातील नामदेव गंगाराम शिंगाडे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘चला जगाशी बोलूया’ (With The World) या उपक्रमांतर्गत जपान येथील शालेय विद्यार्थी व शिक्षकांशी मोबाईल, लॅपटॉपद्वारे ऑनलाइन संवाद साधला.


पहिल्या सत्रात दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली. आपले छंद, आवडते खेळ, विषय, कलाकार इत्यादींबद्दल चर्चा झाली. दुसऱ्या सत्रामध्ये जपानी विद्यार्थ्यांनी त्यांच्या देशाची माहितीचे सादरीकरण केले, तर गुरोळीच्या विद्यार्थ्यांनी भारत देशाची माहिती देणारे सादरीकरण केले. भारताची राजधानी, राष्ट्रीय प्राणी, पक्षी, चलन, राष्ट्रगीत, प्रभावशाली व्यक्ती इत्यादींची माहिती सांगितली. शेवटच्या सत्रामध्ये प्रश्नोत्तरे झाली.

या उपक्रमासाठी विद्यालयाचे इंग्रजी विषय शिक्षक सचिन घोलप, तर जपान देशाच्या किमीको कावासाकी, लॉरेन नोए यांनी विशेष परिश्रम केले. संवादामध्ये भारत, पाकिस्तान, जपान देशातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

अथर्व हरिश्चंद्र खेडेकर, प्रज्वल संभाजी खेडेकर, आदित्य गणेश शिंगाडे, चैतन्य संदीप शिंगाडे, संस्कृती आनंद खेडेकर, अक्षदा मच्छिंद्र खेडेकर, सेजल विश्वास शिंगाडे, वैष्णवी सोपान झिंजुरके, दिशा म्हस्कू झिंजुरके, श्रेया संतोष खेडेकर या विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला.

या अभिनव उपक्रमाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल क्षीरसागर यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
-------------------
आमच्या मुलांशी संवाद साधायला व आमची जपानी भाषा शिकण्यासाठी भारतीय मुले नेहमीच उत्सुक असतात. ज्या पद्धतीने मुले संवाद साधत होते, यावरून भारतीय मुलांचे शैक्षणिक भवितव्य उज्वल असल्याचे जाणवते. - कुमीको कावासाकी व लॉरेन नोए, समन्वयक व विद्यार्थी सुलभक जपान
-------------------------
जपानची संस्कृती, अभ्यास पद्धती व जीवनशैली जाणून घेण्याची भारतीय मुलांनाही खूप उत्सुकता असते. या मुलांची वेळोवेळी संवाद साधताना मुले एका वेगळ्याच दुनियेत हरवलेली असतात. -सचिन घोलप, इंग्रजी विषय अध्यापक गुरोळी, पुरंदर
-----------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com