स्टुडंट पोर्टल साईटमुळे मुख्याध्यापक हैराण!

स्टुडंट पोर्टल साईटमुळे मुख्याध्यापक हैराण!

पिंपरी, ता.२३ ः शालेय ‘स्टुडंट पोर्टल’चे संकेतस्थळ सदोष असून काही महिन्यांपासून मंदगतीने सुरु आहे. सर्व शाळांना या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांचे आधारकार्ड प्रमाणित करायचे आहे. मात्र पोर्टल वारंवार बंद पडत असल्याने दिवसात केवळ दहा विद्यार्थ्याचे लॉगइन होत आहे. शिक्षकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, शाळांचे अनुदान व संचमान्यता प्रक्रिया रखडणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शाळांचे अनुदान व संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी होणे आवश्‍यक आहे. अनेक दिवसांपासून पोर्टल बंद होते. आता ते सुरु झाले, मात्र वेग अतिशय कमी असल्याने व वारंवार व्यत्यय येत आहे. पुन्हा पुन्हा लॉगिन करावे लागत आहे. प्रत्येकवेळी दहा मिनिटे लागतात. यातून खूप वेळ वाया जातो आहे. बुधवारी (ता. २२) दुपारी पोर्टल बंद झाले होते. आज (गुरूवार) पुन्हा बंद पडले आहे. रात्रंदिवस प्रयत्न करूनही लॉगिन होत नाही. वारंवार बंद पडत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्वरित काम पूर्ण करण्याचे आदेश येत आहेत. त्याचा परिणाम मुख्याध्यापकांच्या मानसिक स्वास्थावर होत आहे. ‘वरिष्ठांनी आधी साइट पूर्ण दुरुस्त करावी, नंतर आम्हाला काम करण्यास थोडा अवधी द्यावा’, अशी मागणी सर्व मुख्याध्यापक वर्गाची आहे.
--
कोट
‘‘स्टुडंट्स पोर्टलवर असलेला विद्यार्थी आधार अपडेट करताना, दुसऱ्याच शाळेत आउट ऑफ स्कूलमध्ये असल्याचा एरर येतो. त्यामुळे मुलांचे आधार अपडेट होत नाहीत. ’’
-साधना दातीर, माजी अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघ
--
‘‘विद्यार्थ्यांनी जर आधार कार्ड अपडेट व्यवस्थित केले. तरच इन व्हॅलीड विद्यार्थी व्हॅलीड होतील. त्यामुळे शंभर टक्के व्हॅलिड कुठल्या शाळेचे विद्यार्थी होणार नाही. स्टुडंट पोर्टलवर जी विद्यार्थी संख्या एकूण नोंदवलेली आहे त्या संख्येवरच संच मान्यता झाली पाहिजे. विद्यार्थी व्हॅलिड किती आहेत? याच्यावर अजिबात होता कामा नये.’’
-हनुमंत मारकड, मुख्याध्यापक श्री गुरू गणेश विद्यामंदिर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज, निगडी
--
‘‘पोर्टलवर काम करताना तांत्रिक अडचणी येतात. त्यासाठी मार्गदर्शन मिळत नाही, प्रशिक्षण नाही. आधार अपडेट करताना विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, जन्म दिनांक यामध्ये चूक असल्यास दुरुस्ती झाल्याशिवाय अपडेट होत नाही. व्हॅलिडेटेड ऐवजी आधार नोंद असलेली पटसंख्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरावी.’’
-शशिकांत जाधव, अध्यक्ष पिंपरी चिंचवड शिक्षकेत्तर संघटना
--
‘‘शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची संचमान्यता करण्यासाठी आधार अपडेट करण्यासाठी मिसमॅच व इनव्हॅलिड हा विषय पर्यवेक्षणीय यंत्रणेमार्फत तपासून एकदाचा आधार अपडेट कार्यक्रम संपविण्यात यावा. यासाठी पूर्वीप्रमाणे ऑफलाईन संचमान्यता करण्यात यावी.’’
-नेहा पवार, मुख्याध्यापिका, वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय नेहरूनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com