अवकाळीच्या भरपाईची
रक्कम होणार खात्यात जमा

अवकाळीच्या भरपाईची रक्कम होणार खात्यात जमा

पुणे, ता. २५ : जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला ७० लाख ६९ हजार ५७० रुपयांची मदत मंजूर झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून तालुकानिहाय लाभार्थ्यांच्या याद्या भरण्याचे काम सुरू केले असून, संबंधितांच्या थेट बँक खात्यात लाभाची रक्कम जमा केली जाणार आहे.
अवकाळी पावसामुळे गेल्या महिन्यात पुरंदर, जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड, हवेली, मावळ आणि मुळशी, या आठ तालुक्यांमधील ८४ गावांतील ४०८.९४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. १ हजार ४३४ बाधितांचे जिरायती, बागायती आणि फळपीक क्षेत्र बाधित झाले होते. याकरिता जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून राज्य सरकारकडे मदतीसाठी अहवाल पाठविला होता. त्यानुसार राज्य सरकारकडून ७० लाख ६९ हजार ५७० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. संबंधित लाभार्थ्यांचे तपशील शासनाच्या यादीनुसार भरण्यात येत आहेत. या याद्या तयार झाल्यानंतर संबंधितांच्या थेट बँक खात्यांत अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नुकसान व भरपाई दृष्टीक्षेपात
बाधित तालुके- ८
बाधित गावे- ८४
बाधित क्षेत्र- ४०८.९४ हेक्टर
बाधित शेतकरी- १ हजार ४३४
जाहीर झालेली मदत- ७० लाख ६९ हजार ५७० रुपये

तालुकानिहाय बाधित गाव, शेतकरी संख्या व क्षेत्र
तालुका.... गावांची संख्या...शेतकरी संख्या....बाधित क्षेत्र
पुरंदर- ०२...........०४..........०.७० हेक्टर
जुन्नर.....०८........२५३.........२५३ हेक्टर
शिरूर....०३.........५२.......२१.४० हेक्टर
आंबेगाव....०८.....७२९.....२१३.७२ हेक्टर
खेड....१८....१२५......३२.६४ हेक्टर
हवेली....०५....२२.....१.७१ हेक्टर
मावळ....३६....२३०....३६.९८ हेक्टर
मुळशी...०४....१९......५.७० हेक्टर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com