Pune Crime News
Pune Crime Newssakal

Pune Crime News : माजी सभापतींच्या मुलावर आस्करवाडीत कोयत्याने हल्ला

भिवरीजवळील आस्करवाडी (ता. पुरंदर) येथील काळूबाई मंदिरात पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती दादासाहेब घाटे यांचा मुलगा अजय याच्यावर मंगळवारी (ता. २३) त्याचा सख्खा चुलता आणि चुलतभावाने कोयत्याने हल्ला केला.

सासवड शहर : भिवरीजवळील आस्करवाडी (ता. पुरंदर) येथील काळूबाई मंदिरात पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती दादासाहेब घाटे यांचा मुलगा अजय याच्यावर मंगळवारी (ता. २३) त्याचा सख्खा चुलता आणि चुलतभावाने कोयत्याने हल्ला केला.

याप्रकरणी रायबा धोंडिबा घाटे (वय ५१) आणि संकेत रायबा घाटे (वय २५ दोघेही रा. पठारवाडी, ता. पुरंदर) यांना अटक केली आहे. जमिनीच्या जुन्या वादातून हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी मंगल दादासाहेब घाटे (वय ५०. रा. चिदानंद सोसायटी, गोकुळनगर, कोंढवा रोड, कात्रज) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी आणि त्यांचा मुलगा अजय हे मंगळवारी आस्करवाडी येथील काळूबाई मंदिरात दुपारी साडेबाराच्या सुमारास देवदर्शनासाठी गेले होते. देवीची आरती झाल्यानंतर ग्रामस्थांसमवेत ते मंदिरात थांबले.

Pune Crime News
Pune Crime News : मुलाला मारण्याची वडिलांनीच दिली सुपारी

यावेळी रायबा आणि त्यांचा मुलगा संकेत हे दोघे मंदिरात आले. रायबा याने अजय यास पाठीमागून पकडले, तर संकेत याने कोयत्याने अजयच्या डोक्यात जोरदार हल्ला केला.
दरम्यान, घटनेची माहिती कळताच सासवड पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला.

जखमी अजय घाटे यास खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी दोनही आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com