Pune Crime News
Pune Crime Newssakal

Pune Crime News : मुलाला मारण्याची वडिलांनीच दिली सुपारी

पुणे : कौटुंबिक वादातून वडिलांनीच बांधकाम व्यावसायिक मुलाचा खून करण्याची ७५ लाख रुपयांची सुपारी गुंडांना दिल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वडिलांसह सहा जणांना अटक केली. सुपारी घेतलेल्यांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पिस्तुलातून गोळी न सुटल्याने व्यावसायिक बचावले होते.

जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्स इमारतीजवळ १६ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बांधकाम व्यावसायिक धीरज अरगडे-पाटील यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी पिस्तूल रोखले. त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

Pune Crime News
Pune Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका वाढणार

याप्रकरणी धीरज यांचे वडील दिनेशचंद्र ऊर्फ बाळासाहेब शंकरराव अरगडे-पाटील (वय ६४, रा. भोसलेनगर), प्रशांत विलास घाडगे (वय ३८, रा. वारजे), अशोक लक्ष्मण ठोंबरे (वय ४८, रा. एरंडवणे), प्रवीण ऊर्फ पऱ्या तुकाराम कुडले (वय ३१, रा. सुतारदरा, कोथरूड), योगेश दामोदर जाधव (वय ३९) आणि चेतन अरुण पोकळे (वय २७) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत धीरज दिनेशचंद्र अरगडे-पाटील (वय ३८,रा. खडकी) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. धीरज अरगडे यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांच्या मोटारीत जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली होती. १६ एप्रिल रोजी अरगडे मोटारीतून जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयात आले. याबाबतची माहिती आरोपींना समजली. त्यानंतर आरोपींनी तेथे पाळत ठेवली.

ते कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर पिस्तूल रोखून गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले होते. दरम्यान, अरगडे यांच्यावर यापूर्वी १० मार्च रोजी आरोपींनी चाकूने वार केले होते. त्यावेळी ते बचावले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com