कविता संदेश आल्हाट

कविता संदेश आल्हाट

Published on

प्रा. कविता संदेश आल्हाट (प्रभाग क्र.२)

शाश्वत विकासावर आधारित आदर्श प्रभागाचा संकल्प


इंट्रो ः अभ्यासपूर्ण विचार, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व आणि संघटन कौशल्याच्या जोरावर प्रा. कविता संदेश आल्हाट यांनी अल्पावधीतच पिंपरी चिंचवडच्या राजकीय नकाशावर आणि मोशी उपनगरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. उच्चशिक्षित आणि अभ्यासू नेत्या म्हणून प्रा. आल्हाट यांचा उल्लेख विशेष केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी शहराध्यक्षा म्हणून त्यांनी विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी केली आहे. स्वच्छ, सुरक्षित, सुसंस्कृत आणि शाश्वत विकासाचा तसेच प्रत्येकाला मूलभूत सुविधा, संधी आणि अभिनामाने जगण्याचा हक्क देणारा आदर्श प्रभाग घडविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
---------

सं यम, संवेदनशीलता आणि जनसेवेची वृत्ती या गुणांच्या आधारे प्रा. आल्हाट यांनी आपले नेतृत्व घडवले आहे. त्यांचे नेतृत्व केवळ पक्षीय चौकटीत मर्यादित नसून ते नागरिकांच्या जीवनाशी घट्ट जोडलेले आहे. महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी प्रभाग क्रमांक दोनला आदर्श मॉडेल बनविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या कार्यशैलीतून त्यांची दूरदृष्टी स्पष्ट दिसते. या प्रभागात त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि पायाभूत विकासाच्या चारही आघाड्यांवर संतुलित कार्य केले आहे. प्रभागातील रस्ते, स्मशानभूमीमधील डांबरीकरण, नालेसफाई व अतिक्रमणमुक्त उपक्रमांमुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधा सुधारल्या आहेत. या सर्वांमुळे प्रभाग क्रमांक दोन केवळ भौतिकदृष्ट्या नव्हे; तर सामाजिक जाणीवा, नागरिकांचा सहभाग, आरोग्य आणि संस्कृती या सर्व स्तरांवर नव्या पिढीचा आदर्श प्रभाग म्हणून आकार घेत आहे.

महिला, तरुणांसाठी कार्य
आर्थिक स्वावलंबनाच्या संधी निर्माण करून प्रा.आल्हाट यांनी महिला वर्गाला विकासाच्या प्रवाहात सामील केले. बचत गटांद्वारे उत्पादने बाजारात आणून ‘लोकल टू ग्लोबल’ संकल्पनेचा पाया प्रभाग स्तरावर रचला. महिला शहराध्यक्षा झाल्यानंतर त्यांनी बचत गटांना प्रशिक्षण, शासकीय योजनांचा लाभ आणि उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘खेळ पैठणीचा - न्यू होम मिनिस्टर’ हा सांस्कृतिक कार्यक्रम खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला भजनी मंडळ स्पर्धा, सन्मान सोहळे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे त्यांनी महिला वर्गाशी संवाद वाढवला.

सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशील
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. आल्हाट या कार्यरत आहेत. एम.ए, एम.पी.एड अशा उच्चशिक्षणासह त्या राजकीय क्षेत्रातील विद्वान आणि सुसंस्कृत चेहरा ठरल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील दीर्घ अनुभवामुळे त्या विविध विषयांना तर्कशुद्ध आणि प्रगल्भ दृष्टिकोनातून पाहतात. शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्नांबाबत अधिक संवेदनशील आहेत. आल्हाट यांनी प्रत्येक विषयावर अभ्यासपूर्वक भूमिका मांडली आहे. त्यांच्या विचारसंपन्न भाषणशैलीमुळे त्या पक्षातील तसेच शहरातील महिला कार्यकर्त्यांच्या प्रेरणास्थान बनल्या आहेत. अजित पवार आणि रुपाली चाकणकर यांच्या विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी पक्षाच्या धोरणांनुसार महिला संघटन बळकट केले आहे.


नागरिकांशी थेट संवाद
घराघरांत जाऊन प्रा.आल्हाट समस्यांची माहिती घेतात. तक्रारींवर त्वरित कार्यवाही होईल, यासाठी प्रशासनाशी संपर्क ठेवतात. त्यामुळे ‘आपल्या प्रभागातील आपली ताई’, अशी त्यांची ओळख जनमानसात झाली आहे. प्रा. आल्हाट यांच्या पुढाकाराने मोशी परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण, स्मशानभूमीचे नूतनीकरण, दशक्रिया विधी घाटाचा विकास आणि अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती अशा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम व पालकांसाठी मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जात आहेत.

आरोग्यविषयक जनजागृती
मोशी परिसरात आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरे नियमितपणे घेऊन नागरिकांच्या आरोग्याचे संवर्धन करण्यावर त्यांनी भर दिला आहे. महिलांसाठी विनामूल्य कर्करोग तपासणी शिबिर, पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वैद्यकीय तपासणी हे त्यांचे आरोग्यविषयक उपक्रम ठरले. गटारे, रस्ते, नाले या स्वच्छतेच्या समस्यांबाबत त्यांनी प्रशासनाला दखल घेण्यास भाग पाडले. पशुधन वाचवा अभियानातून शेतकऱ्यांच्या जनावरांचे लसीकरण करून त्यांचे संरक्षण केले.

भ्रष्टाचाराविरोधात भूमिका
मोशी परिसरातील नाले, रस्ते व सांडपाण्याच्या समस्या, कचरा डेपोतील आगीचे प्रकार आणि अतिक्रमणाच्या प्रश्नांवर प्रा. आल्हाट यांनी प्रशासनासमोर ठामपणे भूमिका मांडली. मोशी कचरा डेपोतील संशयास्पद आगीच्या घटनेवर त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून चौकशीची मागणी केली. या चौकशीमुळे संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर पडदा उघडला गेला. त्यांच्या धाडसी भूमिकेमुळे नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य मिळाले आणि प्रशासनालाही उत्तरदायित्व स्वीकारावे लागले. त्यामुळे, मोशीकरांच्या आरोग्य आणि पर्यावरण प्रश्नांवर ठोस कारवाईला गती मिळाली.

ज्येष्ठ नागरिकांसाठी योगदान
ज्येष्ठांना विश्रांती, मुलांना क्रीडा आणि प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल, असा प्रभाग निर्माण करण्याचा संकल्प प्रा.आल्हाट यांनी केला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रात रोज भेटण्याची, वाचन, योग, आरोग्यविषयक चर्चा, छंदवर्ग अशा सुविधा देणे, आरोग्य तपासणी शिबिरे, कायदेशीर सल्ला केंद्र आणि सुरक्षित सार्वजनिक जागा उपलब्ध करणे, ज्येष्ठ नागरिक सन्मान दिन अशा उपक्रम राबविण्यावर त्यांचा भर आहे.

‘लक्षवेध स्पोर्टस’चे क्रीडा उपक्रम
कबड्डीच्या राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून प्रा. आल्हाट यांनी क्रीडा क्षेत्रात ओळख मिळविली आहे. लक्षवेध स्पोर्टस फाउंडेशन स्थापन करून त्‍यांनी स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित योद्धा ८३ सोसायटी प्रीमिअर लीग स्पर्धेत महिला संघांचा समावेश करून त्यांनी खेळातून सक्षमीकरण ही संकल्पना वास्तवात आणली. मुले आणि तरुणांसाठी क्रीडांगण, मिनी फुटबॉल / क्रिकेट मैदान, स्केटिंग / सायकल ट्रॅक, स्मार्ट लायब्ररी आणि अभ्यासिका, सांस्कृतिक आणि विज्ञान उपक्रमांसाठी खुले व्यासपीठही उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत.


पक्ष संघटनेतील दृढ नेतृत्व
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धाडसी विचारसरणीने प्रेरित होऊन प्रा. आल्हाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीचे संघटन मजबूत केले. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही महिन्यांत शहरातील महिला कार्यकर्त्यांचे संघटन बांधले. महागाई, इंधन दरवाढ, तत्कालीन राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात आणि सत्ताधाऱ्यांच्या अन्यायकारक धोरणांविरोधात त्यांनी आक्रोश आंदोलन आणि निषेध मोर्चे यशस्वीपणे आयोजित केले. अशा प्रत्येक संघर्षात त्यांचे नेतृत्व ठळकपणे दिसले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महिला संघटन आता सक्षम व सक्रीय झाले आहे.

संकटकाळात जनसेवेवर निष्ठा
राज्यातील अतिवृष्टी, पूरपरिस्थितीत प्रा. आल्हाट यांनी वैयक्तिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात दिला. कोरोना काळात त्यांनी विविध वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांची ‘आरटीपीसीआर’ तपासणी व लसीकरणाची मोहीम राबविली. संकट काळात मदतीचा हात देताना पक्षभेद न मानता मानवतेच्या भावनेतून काम करणे, ही त्यांची ओळख ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com