उभे यांच्या स्मरणार्थ नियोजित इमारतीस देणगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उभे यांच्या स्मरणार्थ नियोजित इमारतीस देणगी
उभे यांच्या स्मरणार्थ नियोजित इमारतीस देणगी

उभे यांच्या स्मरणार्थ नियोजित इमारतीस देणगी

sakal_logo
By

पिरंगुट, ता. १२ : कोळावडे (ता.मुळशी) येथील दिवंगत माजी सरपंच रामचंद्र उभे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांकडून मुठा खोरे वारकरी सांप्रदाय समितीच्या नियोजित इमारत बांधकामासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली. येथील आदर्शनगरमधील अखंड हरिनाम महोत्सवावेळी ही देणगी संप्रदाय समितीच्या पादधिकाऱ्यांकडे देण्यात आली.
यावेळी पोलिस पाटील विजय रामचंद्र उभे, गायक संदीप रामचंद्र उभे, संप्रदाय समितीचे अध्यक्ष रामचंद्र महाराज भरेकर, भाऊसाहेब मोहोळ, माऊली साळेकर, अशोक मेमाणे, नामदेव पारखी, माऊली साळेकर, के.बी चौधरी, विठ्ठल शिंदे, निवृती मारणे आदी विश्वस्त तसेच संत तुकाराम कारखान्याचे संचालक अंकुश उभे, संजय उभे, माजी सरपंच सयाजीराव आढाव, महिपती शिंदे, काशिनाथ उभे, पुरुषोत्तम उभे, प्रकाश उभे, मारुती शिंदे, अनिल सोनावणे, दिलीप शिंदे, श्रीकांत कोंढेकर, वसंत उभे, मारुती उभे, श्‍यामराव येनपुरे आदी उपस्थित होते.
01863