रिहे येथे उद्यापासून बालसंस्कार शिबिर

रिहे येथे उद्यापासून बालसंस्कार शिबिर

पिरंगुट, ता. २० : रिहे (ता. मुळशी) येथील बोरकर मळ्यातील वेदान्त साधना वारकरी गुरुकुलमध्ये २३ एप्रिल ते १४ मे या कालावधीत निवासी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या ‘धी शुद्धीकरण संस्कार शिबिर २०२३’ या शिबिरात विविध संस्कारक्षम उपक्रम राबविले जाणार आहेत. शिबिरात १० ते २० या वयोगटातील मुलामुलींचा समावेश आहे. शिबिरात रोज संस्कार, भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, गीता, संस्कृत पाठ, गायन, वादन, काकडा, व्यायाम, कथाकथन, शस्त्र परिचय, संतचरित्र परिचय, योगा, हरिपाठ, फुगडी, वारकरी चाली, वेगवेगळे खेळ तसेच ‘मातृ-पितृ पूजन’ हा विशेष सोहळा पार पडणार आहे. यामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायणही आयोजित केले आहे.

या वेळी वेदान्त साधना वारकरी गुरुकुल संस्थेचे संस्थापक वेदान्ताचार्य निवृत्ती महाराज बोरकर यांनी सांगितले, की यावर्षी संस्कार शिबिरात ऐंशीहून अधिक मुलांनी सहभाग नोंदविला आहे. समाजामध्ये नीतिमूल्यांची जोपासना दृढ व्हावी आणि कोवळ्या बालमनावर सुसंस्कार घडावेत यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे. सध्या मोबाईलसारख्या माध्यमांचे अनेक बरे-वाईट परिणाम मुलांवर होत आहेत. मुले व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यांचा बौद्धिक व शारीरिक विकास होण्यासाठी संतविचार व संतवाङ्मयाची अत्यंत आवश्यकता आहे.’’ या संदर्भात पालकांनी निवृत्ती बोरकर शास्त्री (९२८४५५५८४५), संतोष पायगुडे (९८८१८५८०२४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com