मुळशीत गिरीश बापट यांना सर्वपक्षियांकडून श्रद्धांजली

मुळशीत गिरीश बापट यांना 
सर्वपक्षियांकडून श्रद्धांजली

पिरंगुट, ता. २९ : दिवंगत खासदार गिरीश बापट यांना मुळशी तालुक्यातील सर्व पक्षीयांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. उरवडे (ता. मुळशी) येथील मॅांट व्हर्ट संस्थेमध्ये आयोजित केलेल्या या शोकसभेत विविध समाजोपयोगी उपक्रम पार पडले. यावेळी निराधारांना पक्के घर मिळावे, यासाठी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत अडीच लाख रुपयांचे मंजुरी पत्र लाभार्थ्यांना देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेला गौरव बापट आणि भाजप युवा मोर्चातर्फे रोख रक्कम देण्यात आली. मुठा खोऱ्यातील सिद्धेश्वर गावात कित्येक वर्षांपासून नदीवर मोठ्या पुलाची मागणी होती. ती मागणी मान्य करून पालकमंत्री असताना गिरीश बापट यांनी एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये रक्कमेचा निधी दिला होता. त्यामुळे तेथील पुलाला खासदार गिरीश बापट पूल असे नाव देण्यात आले. त्या पुलाच्या नामशिलालेखाचे अनावरण करून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी गिरीश बापट यांच्या आठवणी सांगून श्रद्धांजली अर्पण केली. मुळशी तालुका भाजप युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष सागर मारणे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास माजी आमदार शरद ढमाले, माजी महापौर शांतिलाल सुरतवाला, माजी सभापती बाळासाहेब चांदेरे, भाजपचे मुळशी तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे, मुळशी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक करंजावणे, तात्यासाहेब देवकर, भाऊ आखाडे, तात्या देवकर, सुनील वाडकर, माऊली कांबळे, राजेंद्र मारणे, सचिन धुमाळ, गणेश सुतार, शेखर शिंदे तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com